News Flash

नात नव्या नंदाला यशस्वी होताना पाहून भावूक झाले बिग बी; म्हणाले, “मला तुझा गर्व वाटतो….”

बिग बी सोबतच बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी सुद्धा तिच्या या पोस्टवर कमेंट्स करत तिचं कौतुक केलंय.

amitabh-Bachchan-Navya-Naveli-Nanda-IG-1200

बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांची नव्या नवेली नंदा सोशल मीडियावर सक्रिय झाल्यापासून लागोपाठ चर्चेत आलीय. काही दिवसांपूर्वीच ती तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत पार्टी एन्जॉय करताना दिसून आली. याचे काही फोटोज सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यासोबत ती तिच्या पर्सनल लाइफबद्दल फॅन्सना कायम घोळात टाकत असते. फॅन्सची उत्सुकता पाहून ती सुद्धा तिच्या सोशल मीडियावर लागोपाठ पोस्ट शेअर करत असते. पण यंदा तिने एका मॅगझिनचं कव्हरपेज शेअर केलंय. यामूळे ती बरीच लाइमलाइटमध्ये आलीय.

नव्या नवेली नंदा नुकतंच एका मॅगझिनच्या कव्हरपेजवर झळकलीय. यात तिच्यासोबत अहिल्या मेहता, माल्लिका शाहणे आणि प्रज्ञा साबू हे देखील दिसून येत आहेत. तिच्या या पोस्टवर बिग बी अमिताभ बच्चन यांनी कमेंट केलीय. यात त्यांनी लिहिलंय, “मला तुझा गर्व वाटतो नव्या…आय लव्ह यू.” तर सुहाना खानने सुद्धा तिच्या या पोस्टवर कमेंट करत तिचं कौतुक केलंय. ‘अमेजिंग’ असं लिहित तिने लव्ह इमोजी जोडली आहे. सोबतच शनाया कपूर, महीप कपूर, श्वेता बच्चन, सोनाली बेंद्रे सारख्या बड्या कलाकरांनी सुद्धा तिच्या या पोस्टवर कमेंट करत तिचं कौतुक केलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Navya Naveli Nanda (@navyananda)

महिलांना टिप्स देतेय नव्या नवेली नंदा

२३ वर्षीय नव्या नवेली नंदा आरा हेल्थची संस्थापक आहे. ती नेहमीच महिलांना वेगवेगळ्या टिप्स देत असते. नुकतंच आपलं ग्रॅज्यूएशन पूर्ण करून ती भारतात परतलीय. त्यानंतर ती सोशल मीडियावर झळकू लागली आहे. नव्या नंदा ही श्वेता बच्चन आणि निखिल नंदा यांची मुलगी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2021 9:11 pm

Web Title: amitabh bachchan emotional after seeing grand daughter navya naveli nanda success prp 93
Next Stories
1 रूबीना दिलैकने शेअर केला BTS व्हिडीओ; सोशल मीडियावर होतोय व्हायरल
2 ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेच्या कलाकारांनी कोकणवासीयांसाठी दिला मदतीचा हात
3 ‘आणि काय हवं’ म्हणत जुई आणि साकेत पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला