News Flash

बॉलिवूडचे बिग बी भडकले; घरात बदल केल्यामुळे बिग बींना झाला मोठा मनस्ताप

ब्लॉगमधून केली नाराजी व्यक्त

बॉलिवूडचे ‘महानायक’ अमिताभ बच्चन त्यांच्या सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात आणि त्यांच्या कित्येक गोष्टी ते ट्विट करून लोकांसोबत शेअर करत असतात. याशिवाय ते दररोज ब्लॉग सुद्धा लिहितात आणि त्यांच्या मनातल्या व्यथा लोकांसोबत शेअर करत असतात. नुकतंच बिग बींनी त्यांच्या घरात बदल केल्यामुळे मोठ्या मनस्तापाला समोरं जावं लागलंय. मनातली हीच व्यथा अमिताभ बच्चन यांनी नुकतंच एका ब्लॉगमधून लोकांसोबत शेअर केलीय.

काही दिवसांपुर्वीच अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या बंगल्याचं रेनोवेशन केलं होतं. यात त्यांचे वडिल हर‍िवंश राय बच्चन यांनी स्वतः लिहिलेल्या काही कविता मिळत नसल्यानं बिग बीं भडकले आहेत. बिग बींचे वडिल हर‍िवंश राय बच्चन हे महान हिंदी कव‍ी होते. त्यांनी लिहिलेल्या ‘मधुशाला’ कविता आज ही अव्वल दर्जाच्या कव‍िता मानल्या जातात. त्यांची आठवण म्हणून बिग बींनी या कविता घरात जपून ठेवल्या होत्या. पण आता या कविता त्यांना घरात सापडत नाहीत. यामुळे नाराज होऊन बिग बींनी एक ब्लॉग लिहून आपला राग व्यक्त केलाय.

या ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन यांनी लिहिलं, “वडिलांच्या ऑटोबायोग्राफीमध्ये कित्येक कवितांचे संदर्भ दिले आहेत. वडिलांनी स्वतःच्या हाताने लिहिलेल्या त्या कविता आता मी शोधतोय तर सध्या कुठेच सापडत नाहीयेत…गेल्या काही दिवसात घरात काही बदल केले होते, त्यामुळे आता वडिलांनी लिहिलेल्या कविता सापडत नाहीत, याचा विचार करून खूप राग येतोय…हा निव्वळ निष्काळजीपणा आहे…”

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

यापुढे लिहिताना बिग बी म्हणाले, “मी थोडी सुद्धा कल्पना नव्हती की घरात केलेल्या बदलांमुळे इतका मनस्ताप होईल…तुम्ही एखादी वस्तू जपून एका ठिकाणी ठेवता आणि जेव्हा तुम्ही ती शोधायला जाता तेव्हा ती सापडत नाही किंवा मग तुम्ही विसरता.”

अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच गेम शो ‘कौन बनेगा करोडपती 13’ मधून टीव्हीवर परतणार आहे. याशिवाय ते ‘गुड बाय’, ‘ब्रह्मास्त्र’, ‘झुंड’, ‘चेहरे’ आणि ‘मेडे’ चित्रपटातून झळकणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2021 9:00 pm

Web Title: amitabh bachchan express anger on not finding fathers manuscripts due to change of residence prp 93
Next Stories
1 Viral Video : परेश रावल यांच्या वाढदिवशी शिल्पाने शेअर केला हा व्हिडीओ; म्हणाली, “बेस्ट लकची गरज…”
2 गायक राहूल वैद्यने सुशांतची आठवत काढत शेअर केली इमोशनल पोस्ट; सुशांत भाई मिस यू….
3 टप्पूवर जेठालाल नाराज, खऱ्या आयुष्यात दिलीप जोशी आणि राज अनदकतमध्ये वाद?
Just Now!
X