आमिरच्या आगामी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटाची तगडी स्टारकास्ट आणि एकंदर कथानक पाहता कलाविश्वात सर्वांनीच ठग्सविषयी कुतूहल व्यक्त केलं आहे. अशा या बहुचर्चित चित्रपटातील बिग बी अमिताभ बच्चन यांचा लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

या चित्रपटाच्या सेटवरील बिग बी आणि फातिमा सना शेख यांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बिग बींचा हा लूक त्यांच्या ‘वझीर’ या चित्रपटातील भूमिकेची आठवण करून देतो. तर दुसरीकडे फातिमाचा लूक हा ‘गेम ऑफ थ्रोन्स’मधील एमिलिया कार्क साकारत असलेल्या भूमिकेशी मिळताजुळता असल्याचं पाहायला मिळत आहे. यापूर्वी आमिर, कतरिना कैफ यांचेही लूक सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

rajkaran gela Mishit marathi movie on April 19 in theaters
‘राजकारण गेलं मिशीत’ १९ एप्रिलला चित्रपटगृहात
Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
sanjay-leela-bhansali-priyanka-chopra
नऊ वर्षांनी प्रियांका चोप्रा झळकणार संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात; देसी गर्ल लवकरच करणार घोषणा
usha mehta congress radio
ब्रिटिशांना आपल्या आवाजाने ‘सळो की पळो’ करून सोडणार्‍या उषा मेहतांची कहाणी

वाचा : ‘कपिलने मला खोटारडा म्हटल्याचे दु:ख नाही पण…’

‘धूम’ चित्रपटाच्या सीरिजसाठी प्रसिद्ध असलेला दिग्दर्शक विजय कृष्णा आचार्य ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’चे दिग्दर्शन करत असून, या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा केल्या जात आहेत. दिवाळीच्या मुहुर्तावर अमिताभ आणि आमिर यांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहता येईल.