News Flash

‘बिग बीं’नी मानले चाहत्यांचे आभार..

चाहत्यांमध्ये आजतागायत अमिताभ यांची जादू कायम आहे असेच म्हणावे लागेल

अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांच्या आकडा दिवसेंदिवस वाढत आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यातच आता फेसबूक या सोशल नेटवर्किंग साइटवर २.४ कोटी चाहत्यांचा आकडा बिग बींनी पार केला आहे. ‘मी तुम्हा सर्वांचाच आभारी आहे, हा एक विश्वासार्ह प्रवास होता आणि तो तसाच सुरु राहिल अशी मी आशा करतो. अनेक अनेक धन्यवाद’ या शब्दांत अमिताभ यांनी चाहत्यांचे आभार मानत हे चाहत्यांचे प्रेम आणि त्यांच्या आशीर्वादाचेच प्रतिक आहे असेही त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले. सिनेरसिकांच्या मनावर ‘बिग बी’, ‘महानायक’, ‘शहेनशाहा’ अशा अनेक विशेषणांनी अधिराज्य गाजवणारे अभिनेते म्हणजे अमिताभ बच्चन. हिंदी चित्रपटसृष्टीसोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवलेल्या बिग बी आमिताभ यांनी त्यांच्या तमाम चाहत्यांचे आभार मानले आहेत. बच्चन यांनी त्यांच्या फेसबूक अकाउंटवरुन एक पोस्ट करत आभार व्यक्त केले.
चाहत्यावर्गाने इतका मोठा आकडा पार केल्याबद्दल खुद्द आमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरुनही त्यांच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांकडूनही अमिताभ यांच्यावर सध्या सोशल वर्तुळातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान, मि. पर्फेक्शनिस्ट आमिर खान आणि खिलाडी अक्षय कुमार यांना फॉलोअर्सच्या शर्यतीत मागे टाकत अमिताभ बच्चन यांनी बाजी मारली आहे ही लक्ष वेधण्यासारखी बाब. अनेक दशकं चित्रपटसृष्टीत दमदार अभिनयाने चाहत्यांमध्ये आजतागायत अमिताभ यांची जादू कायम आहे असेच म्हणावे लागेल. ‘कुली’, ‘अभिमान’, ‘शोले’, ‘कालिया’, ‘जंजिर’, ‘दिवार’, यांसारख्या चित्रपटांपासून ते आजच्या ‘वझिर’ चित्रपटापर्यंत बॉलीवूडवर अमिताभ यांची जबर पकड आहे असेच म्हणावे लागेल. बिग बींच्या चाहत्यांचा आकडा येणाऱ्या काळात आणखी किती भरारी घेणार याकडेच आता अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2016 10:48 am

Web Title: amitabh bachchan gets 24 million likes on facebook
Next Stories
1 छायाचित्रातील अक्षय कुमारसोबतच्या या मुलाला ओळखलंत का?
2 दिलीप प्रभावळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
3 ‘एम. एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी’मध्ये मी नाही- जॉन अब्राहम
Just Now!
X