23 September 2020

News Flash

..म्हणून बिग बींचा राग झाला अनावर

अमिताभ बच्चन सध्या कुटुंबियांसोबत त्यांच्या क्वॉलिटी टाईम घालवत आहेत.

अमिताभ बच्चन

कित्येक दशकांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत अग्रस्थानी असलेले एक नाव म्हणजे अमिताभ बच्चन. कायमच वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांना प्राधान्य देणं यात बिग बींचा हातखंडा आहे.त्यामुळे त्यांच्या चाहत्यांचा आकडा अगणित आहे. बी बिग जेवढे कलाक्षेत्रात वावरत असतात त्यांचा तेवढाच वावर सोशल मीडियावरही असतो. अनेक वेळा ते वेगवेगळ्या विषयांवर पोस्ट करताना दिसत असतात. त्यामुळे सध्या त्यांनी केलेली एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

अमिताभ बच्चन सध्या कुटुंबियांसोबत त्यांच्या क्वॉलिटी टाईम घालवत आहेत. या सुट्टीतील काही फोटोही त्यांनी शेअर केली असून त्यातील एक फोटो शेअर करत त्यांना आपला राग व्यक्त केला आहे. या फोटोमध्ये त्यांचा नातू अगस्त्या आणि नात नव्या नंदा दिसून येत आहेत.

… the family that Mobiles together, stays together..

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan) on

शेअर केलेल्या फोटोमध्ये बिग बींची दोन्ही नातवंड फोनमध्ये पाहण्यात व्यस्त असल्याचं दिसून येत आहे. मात्र कुटुंबाबरोबर असतानादेखील मोबाईलमध्ये व्यस्त असणं बिग बींना काही फारसं रुचलेलं दिसत नाही. त्यामुळेच त्यांना हा फोटो शेअर केला आहे. ‘जे कुटुंब एकत्र असूनही मोबाईलचा वापर करण्याला प्राधान्य देतात, त्यांच्यासोबत केवळ मोबाईलच राहतो’, असं काहीस नाराजीच्या स्वरात कॅप्शन बिग बींनी या फोटोला दिलं आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसापासून अमिताभ आपल्या कुटुंबाबरोबरचे फोटो शेअर करत असल्याचं पाहायला दिसत आहे. त्यामुळे सध्या या पिकनिकचे फोटो ते शेअर करताना दिसत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2018 11:12 am

Web Title: amitabh bachchan grand children viral pics
Next Stories
1 ‘भारतात क्रिकेटइतकं महत्त्व अन्य खेळांना दिलं जात नाही ही शोकांतिकाच’
2 FIFA World Cup : बिग बी, अभिषेक फुटबॉल सामना पाहण्यासाठी पोहोचले रशियात
3 आराध्याचा ‘हा’ निरागस फोटो होतोय व्हायरल
Just Now!
X