कलाविश्वात एखाद्या सेलिब्रिटीला चाहत्यांचं जितकं प्रेम मिळतं तितकंच प्रेम या सेलिब्रिटींच्या मुलांनाही मिळतं. सेलिब्रिटी किड्सच्या यादीतील असंच एक नाव म्हणजे आराध्या बच्चन. बिग बी अमिताभ बच्चन यांची नात आणि अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन यांची लाडकी लेक आराध्या चाहत्यांचीही लाडकी आहे. माध्यमांसमोर येणं असो किंवा एखाद्या कार्यक्रमाला कुटुंबियांसोबत हजेरी लावणं असो, आराध्या नेहमीच अनेकांची मनं जिंकून जाते. सध्याही सोशल मीडियावर तिचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ऐश्वर्या राय बच्चनच्या एका फॅनपेजवरुन पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये आराध्या मोठ्या प्रेमाने आपल्या आजीचा म्हणजे वृंदा राय यांचा निरोप घेताना दिसत आहे. मंगळवारी ऐश्वर्या राय, तिची आई वृंदा राय आणि आराध्या या बाहेर गेल्या होत्या. त्यानंतर त्या ठिकाणहून निघतेवेळी जेव्हा आपल्या आजीला निरोप देण्याची वेळ आली तेव्हा आराध्याचा चेहरा हिरमुसला. आजीला मिठी मारत तिला अगदी रडवेल्या चेहऱ्याने निरोप देणारी आराध्या पाहून तिच्या आजीचा चेहराही पाहण्याजोगा झाला होता.

https://www.instagram.com/p/BjG2T3yDcNG/

वाचा : महेंद्रसिंह धोनी बनतोय क्रिकेटचा नवीन देव…

सोशल मीडियावर आराध्याचा हा पहिलाच व्हिडिओ व्हायरल झालेला नाही. याआधीही बच्चन कुटुंबियांसोबत विविध कार्यक्रमांच्या वेळचे तिचे व्हिडिओ फॅन पेजवरुन पोस्ट करण्यात येतात. मुळात कुटुंबाला असणारा मान आणि आपल्याला मिळणारे संस्कार या सर्व गोष्टी हाताशी घेत बच्चन कुटुंबातील ही लाडकी लेक खऱ्या अर्थाने सर्वांची मनं जिंकतेय असंच म्हणावं लागेल.