News Flash

ग्रॅजुएशननंतर अमिताभ यांच्या नातीने सुरु केला स्वत:चा हा बिझनेस

नव्याच्या आईला आणि मामा अभिषेकला तिचा अभिमान वाटत आहे.

सध्या सर्व स्टारकिड्स बॉलिवूडमध्ये एण्ट्री करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाने ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर लाइमलाइटपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच नव्याचे ग्रॅजुएशन पूर्ण झाले आहे. आता तिने नवा बिझनेस करण्याचा निर्णय घेतला आहे.

नव्याने बिझनेस सुरु देखील केला आहे. या बिझनेसद्वारे ती महिलांची मदत करणार आहे. नव्याच्या या बिझनेसबद्दल ऐकून आई श्वेता बच्चन आणि मामा अभिषेक बच्चनला नव्याचा अभिमान वाटत आहे.

View this post on Instagram

Our Mission

A post shared by Aara Health (@aarahealth) on

नव्याने सोशल मीडियावर महिलांसाठी एक प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे. त्याचे नाव ‘आरा’ असे आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे ती महिलांच्या आरोग्यासंबंधीत असलेल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. नव्याच्या या निर्णयानंतर आई श्वेता आणि मामा अभिषेक यांना आनंद झाला असून त्यांना नव्याचा अभिमान वाटत आहे. अभिषेकने सोशल मीडियावर पोस्ट करत ‘खूप चांगलं काम करते नव्या. मला तुझा अभिमान आहे’ असे म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी नव्याचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले आहे. याची माहिती खुद्द अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली होती. नव्याची ग्रॅज्युएशन पार्टी न्यूयॉर्कमध्ये आयोजित करण्यात आली होती. पण लॉकडाउनमुळे ती रद्द करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 1:09 pm

Web Title: amitabh bachchan grand daughter navya naveli nanda started her own business avb 95
Next Stories
1 झी टॉकीजमुळे मे महिना होणार खास; प्रेक्षकांना मिळणार चित्रपटांची मेजवानी
2 करोनासाठी चीनला दोषी ठरवणं पडलं महागात; गायकाने मागितली माफी
3 प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच 46 व्या वर्षी जतीन कणकियांने घेतला होता जगाचा निरोप
Just Now!
X