27 February 2021

News Flash

‘तिची आई काय काम करते?’, ट्रोल करणाऱ्याला नव्याचे सडेतोड उत्तर

तिने उत्तर देत चांगलेच सुनावले आहे.

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा सध्या चर्चेत आहे. या चर्चा तिने वडिलोपार्जित व्यवसायासात करिअर करण्याचे ठरवल्यामुळे सुरु झाल्या आहेत. तिने याबाबत एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे. त्यानंतर नव्याने तिचा एक नवा प्रोजेक्ट लाँच केला आहे. त्याचे पोस्टर तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. एका महिलेने या पोस्टवर कमेंट करत नव्याची आई श्वेताला नंदाला ट्रोल केले. ते पाहून नव्याने त्या महिलेला चांगलेच सुनावले आहे.

वोगइंडियाच्या या पोस्टमध्ये नव्याने एका मुलाखतीमध्ये केलेल्या वक्तव्याचा उल्लेख केला आहे. तिने म्हटले की त्यांच्या कुटुंबातील महिलांना काम करताना पाहूनच ती लहानाची मोठी झाली आहे. तिची आई, आजी आणि आत्या या नेहमी काम करत असतात.

या पोस्टमध्ये नव्याने महिलांचे स्वातंत्र आणि शिक्षणचा उल्लेख केला होता. तिच्या या पोस्टवर एका महिलेने कमेंट करत ‘तिची आई काय करते? LOL’ असे म्हटले आहे.

आणखी वाचा- बिग बींच्या नातीचा ‘प्रोजेक्ट नवेली’, बॉलिवूडकडे फिरवली पाठ

नव्याने तिच्या या कमेंटवर उत्तर देत तिला सुनावले आहे. ‘ती एक लेखक, डिझायनर, पत्नी आणि आई आहे’ असे नव्या म्हणाली. त्याच सोबत नव्याने हा स्क्रीनशॉट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला शेअर केला आहे. त्यासोबतच एक आई आणि पत्नी होणे हा फूलटाइम जॉब आहे. ज्या महिला गृहिणी आहेत त्यांना कृपया कमी लेखू नका असे तिने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2021 2:17 pm

Web Title: amitabh bachchan grand daughter naya naveli slams a woman who trolled her mother shweta nanda avb 95
Next Stories
1 बालिका वधूचं स्वप्न पूर्ण, तेलगू सिनेमाची निर्मिती
2 काय असेल सुबोध भावेची ‘नवी’ गोष्ट?
3 “पावरी हो रही है” नक्की आहे तरी काय?
Just Now!
X