News Flash

बिग बींच्या नातीचं ग्लॅमरस फोटोशूट पाहिलंत का ?

या फोटोमध्ये नव्या हॉट ऑणि बोल्ड अंदाजात दिसून येत आहे.

नव्या नवेली नंदा

बॉलिवूडमध्ये अनेक वेळा स्टारकिडची चर्चा रंगताना दिसते. या स्टारकिडमध्ये बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हीदेखील अनेक वेळा चर्चेत येत असते. सतत प्रकाशझोतात राहणाऱ्या नव्याने फोटोशूट केलं आहे. सध्या तिचे हे फोटो व्हायरल होत असून हे फोटो शूट तिने आपल्या आईसाठी अर्थात श्वेता बच्चनसाठी केल्याचं समोर आलं आहे.

स्टायलिश आणि मोस्ट पॉप्युलरमध्ये नव्याचं नाव कायमच अग्रस्थानावर असतं. अनेक वेळा नव्या सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत असते. मात्र यावेळी तिचे फोटो श्वेताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये नव्या हॉट ऑणि बोल्ड अंदाजात दिसून येत आहे. प्रथम हे फोटो शूट करण्यासाठी नव्याने नकार दिला होता. मात्र आईच्या आग्रहाखातर तिने हे शूट केलं. त्याबदल्यात नव्याला घरी गेल्यावर भरपूर चिप्स आणि चॉकलेटस् गिफ्ट म्हणून मिळाल्याचंही श्वेताने सांगितलं.

श्वेताने फॅशन डिजाइन मोनिषा जयसिंह हिच्याबरोबर एक नवा हा ब्रॅण्ड सुरु केला आहे. या नव्या ब्रॅण्डसाठी नव्याने फोटोशूट केल्याचं सांगण्यात येत आहे. तर काही दिवसापूर्वी नव्याने आई आणि आजी जया बच्चन यांच्याबरोबरही वोग इंडियासाठी ग्लॅमरस फोटो शूट केलं होतं.

Our in house model was paid in Lays chips #MxS #MonishaxShweta

A post shared by S (@shwetabachchan) on

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2018 4:35 pm

Web Title: amitabh bachchan grand daughters navya naveli
Next Stories
1 एकेदिवशी निशाला लातूरला घेऊन जाणारच, सनीच्या पतीनं व्यक्त केली इच्छा
2 ‘गोल्ड’मुळे अक्षयच्या लोकप्रियतेत तुफान वाढ, असं केलं चाहत्यांनी प्रेम व्यक्त
3 Manto trailer: ‘गुलाम थे तो आजादी का ख्वाब देखते थे, और अब आजाद हुए तो….’
Just Now!
X