News Flash

हात जोडून बिग बींनी मानले चाहत्यांचे आभार; म्हणाले…

वाचा, बिग बी काय म्हणाले

अभिनेता अमिताभ बच्चन यांना करोनाची लागण झाली आहे. करोना पॉझिटिव्ह असल्याचं समजताच ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली होती. सध्या नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असून ते ट्विटरच्या माध्यमातून प्रकृतीचे अपडेट्स चाहत्यांना देत आहेत. यामध्येच त्यांनी एक ट्विट करुन चाहत्यांचे आभारदेखील मानले आहेत.

बिग बींना करोनाची लागण झाल्याचं समजताच कलाविश्वात आणि चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्याविषयीची काळजी व्यक्त केली होती. तर अनेक मंदिरांमध्ये त्यांच्यासाठी खास पूजा, अभिषेकदेखील करण्यात आला होता. विशेष म्हणजे चाहत्यांचं हे प्रेम पाहून बिग बी भारावून गेले असून त्यांनी ट्विट करत सगळ्यांचे आभार मानले आहेत. त्यांनी हात जोडून एक फोटो शेअर केला आहे.

“या कठीण प्रसंगात तुम्ही माझ्यावर करत असलेलं प्रेम आणि माझ्यासाठी करत असलेली काळजी या सगळ्यातच माझा दिवस जात आहे. या सोशल मीडियाच्या माध्यमातून शक्य होईल तसं सगळ्यांच्याच शुभेच्छा स्वीकारण्याचा प्रयत्न करत आहे. तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद”, असं ट्विट अमिताभ बच्चन यांनी केलं आहे.

दरम्यान, सध्या करोना विषाणूने देशात थैमान घातलं आहे. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना आतापर्यंत करोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळालं. यातच बिग बींनादेखील करोनाची लागण झाली असून त्यांच्यासोबत अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय-बच्चन आणि आराध्या बच्चन यांनाही करोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2020 11:44 am

Web Title: amitabh bachchan gratitude health recover nanavati hospital ssj 93
टॅग : Coronavirus
Next Stories
1 दीपिकाने चाहत्याकडे मागितलं मोबाईलचं कव्हर; व्हिडीओ होतोय व्हायरल…
2 सुशांत आत्महत्या प्रकरण : पत्रकार राजीव मसंदची होणार पोलीस चौकशी
3 ‘राजीसाठी मला कुठेच क्रेडिट दिलं नाही’; लेखकाचा मेघना गुलजारवर आरोप
Just Now!
X