18 January 2019

News Flash

…म्हणून फेसबुकवरही अमिताभ बच्चनच ‘शहेनशहा’

फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर या तीनही सोशल साईटवर बिग बींचा जलवा पाहायला मिळतो

अमिताभ बच्चन

७५ व्या वर्षीही सिनेमांत वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांचं मन जिंकणारे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी अजून एक रेकॉर्ड केला आहे. सोशल मीडियावर सर्वात जास्त सक्रिय असणाऱ्या शहेनशहा अमिताभ यांच्या फॉलोवर्सची यादी वाढतच चालली आहे. फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर या तीनही सोशल साईटवर बिग बींचा जलवा पाहायला मिळतो. नुकतेच फेसबुकवर ३ कोटी फॉलोवर्सचा आकडा पार केला आहे.

बच्चन यांच्या फेसबुकवर ३ कोटींहून अधिक फॉलोवर्स असल्याची माहिती बिग बींनी स्वतः फेसबुकवर दिलीये. अमिताभ यांनी काही मजेशीर फोटोंसह २००७ मध्ये त्यांनी जी पोस्ट केली होती ती शेअर करत म्हटले की, ‘फेसबुकवर ३ कोटी फॉलोवर्स, तुम्ही सगळ्यांनी मला जे प्रेम दिलं आहे त्यासाठी मनःपूर्वक आभार.’

ट्विटरवर अमिताभ यांचे ३.४ कोटींहून जास्त फॉलोवर्स आहेत. तर इन्स्टाग्रामवर ८० लाखांहून जास्त फॉलोवर्स आहेत. अमिताभ यांच्या सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर नुकताच त्यांचा १०२ नॉट आउट हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमात त्यांच्यासोबत ऋषी कपूर यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. अमिताभ आणि ऋषी यांनी २७ वर्षांनी स्क्रिन शेअर केली आहे. पहिल्यांदा या दोघांनी १९७६ मध्ये कभी कभी या सिनेमात एकत्र काम केले होते. यानंतर १९९१ मध्ये अजूबा सिनेमात शेवटचे काम केले.

First Published on May 17, 2018 6:30 pm

Web Title: amitabh bachchan has 30 million followers on facebook