News Flash

बिग बींचा जलसा झाला कंटेन्मेंट झोन फ्री; मुंबई महापालिकेने उतरवला बोर्ड

१४ दिवसांनंतर बिग बींचा बंगला कंटेन्मेंट झोनमधून बाहेर

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेरचा कंटेन्मेट झोनचा बोर्ड मुंबई महापालिकेने उतरवला आहे. बिग बींना करोना विषाणूची लागण झाली होती. त्यामुळे त्यांचा बंगला सील करण्यात आला होता. तसंच त्यांच्या बंगल्याबाहेर कंटेन्मेंट झोनचा बोर्डही लावण्यात आला होता. हा बोर्ड आता मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काढला आहे. ११ जुलै रोजी हा बंगला सील करण्यात आला होता. आता या बंगल्यावरची कंटेन्मेंट झोनची पाटी उतरवण्यात आली आहे.

अवश्य पाहा – लष्करातील नोकरी सोडून या अभिनेत्रीनं केलं बॉलिवूडमध्ये करिअर

बिग बींची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे ११ जुलै रोजी त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तसेच पाठोपाठ त्यांच्या कुटुंबीयांची देखील करोना चाचणी करण्यात आली. यात अभिषेकदेखील करोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं. त्यानंतर त्यालाही नानावटी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. विशेष म्हणजे या दोघांनाही लवकरच बरं वाटावं यासाठी उज्जैन येथील प्रसिद्ध महाकालेश्वर ज्योर्तिंलिंग मंदिरात अमिताभ आणि अभिषेकसाठी पूजा करण्यात आली. मंत्रोच्चाराच्या घोषात जलाभिषेक करण्यात आला असून महामृत्युंजय मंत्राचं पठण केलं गेलं. दरम्यान गेल्या १५ दिवसांच्या उपचारानंतर बिग बींच्या तब्येतीत सुधार होत आहे. परिणामी लवकरच त्यांना रुग्णालयात घरी सोडले जाईल अशी शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2020 5:32 pm

Web Title: amitabh bachchan home jalsa containment zone free bmc officials remove banners mppg 94
Next Stories
1 “…म्हणून ‘दिल बेचारा’वर टीका करु नका”; नवाजुद्दीनची समिक्षकांना भावूक विनंती
2 टायगर श्रॉफची आई संतापली, अनुराग कश्यपला मागावी लागली माफी
3 Video : नवोदितांनी त्यांच्या कामावर विश्वास ठेवायला हवा- अक्षय इंडीकर
Just Now!
X