News Flash

बिग बींनी पुन्हा एकदा धरली दक्षिणेची वाट

शूटिंगसाठी बिग बी हैदराबादला रवाना

अमिताभ बच्चन

दाक्षिणात्य चित्रपटांचा चाहतावर्ग आणि वेगळ्या धाटणीचे कथानक पाहता अनेक कलाकारांना दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये भूमिका साकारण्याची इच्छा असते. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनाही हा मोह आवरला नाही. कारण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार चिरंजीवी यांच्या आगामी चित्रपटात ते भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर येत आहे.

चिरंजीवी यांच्या ‘से रा नरसिम्हा रेड्डी’ या तेलुगू चित्रपटात ते पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट स्वातंत्र्यसैनिक उय्यालवाडा नरसिम्हा रेड्डी यांच्या जीवनावर आधारित आहे. बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये यासंदर्भातील माहिती दिली असून चित्रपटातील त्यांचा लूकसुद्धा पोस्ट केला आहे.

‘दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा, चिरंजीवी. त्यांच्या आगामी चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारण्याची विनंती त्यांनी माझ्याकडे केली आणि मी ती मान्य केली आहे. त्याच्या शूटिंगसाठी मी हैदराबादला रवाना होत आहे. चित्रपटातील माझ्या लूकचा फोटो तुमच्यासोबत शेअर करत आहे. हा अंतिम नाही मात्र, लूक असाच काहीसा असेल,’ असं बिग बींनी लिहिलं.

वाचा : प्रदर्शनापूर्वीच दिशा- टायगरचा चित्रपट ठरतोय हिट

अमिताभ बच्चन यांनी ‘मनम’ या तेलुगू चित्रपटातही पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. त्याचप्रमाणे लवकरच त्यांचा ‘१०२ नॉट आऊट’ हा हिंदी चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ते ७५ वर्षीय मुलाच्या वडिलांची भूमिका साकारत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या मुलाची भूमिका ऋषी कपूर साकारणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2018 3:49 pm

Web Title: amitabh bachchan is in hyderabad to shoot for south superstar chiranjeevi telugu film
Next Stories
1 VIDEO : वडीलच मुलाला वृद्धाश्रमात पाठवतात, असं कुठे असतं का?
2 सलमानच्या ‘त्या’ कमेंटवर दीपिकानं सुनावले खडे बोल
3 प्रदर्शनापूर्वीच दिशा- टायगरचा चित्रपट ठरतोय हिट
Just Now!
X