बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र अभिषेक बच्चन अद्यापही रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याचा करोना रिपोर्ट पुन्हा एकदा पॉझिटिव्ह आला आहे. परिणामी हताश झालेल्या अभिषेकला प्रोत्साहित करण्यासाठी बिग बींनी एक प्रेरणादायी कविता पोस्ट केली आहे. ही कविता सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

ही कविता बिग बींचे वडिल हरिवंश राय बच्चन यांनी लिहिली होती. या प्रेरणादायी कवितेतील एक कडवं त्यांनी आपल्या मुलासाठी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलं आहे.

धनुष उठा, प्रहार कर, तू सबसे पहला वार कर, अग्नि सी धधक–धधक
हिरन सी सजग सजग, सिंह सी दहाड़ कर, शंख सी पुकार कर
रुके न तू, थके न तू, झुके न तू, थमे न तू
– हरिवंश राय बच्चन

 

View this post on Instagram

 

धरा हिला गगन गुंजा नदी बहा पवन चला विजय तेरी हो जय तेरी ज्योति सी जला जला भुजा भुजा फड़क फड़क रक्त में धड़क धड़क धनुष उठा प्रहार कर तू सबसे पहले वार कर अग्नि सा धधक धधक हिरण सा सजग सजग सिंह सी दहाड़ कर शंख सी पुकार कर रुके न तू थके न तू झुके न तू थमे न तू सदा चले रुके न तू रुके न तू झुके न तू रचयिता:कवि प्रसून जोशी

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan) on

अभिषेक बच्चनला ११ जुलै रोजी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार अभिषेकची प्रकृती स्थिर आहे. तो उपचारांना खूप चांगला प्रतिसाद देत आहे. परंतु तरीही त्याचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे २६ दिवसानंतरही त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला नाही.

देशातील करोना रुग्ण १९ लाखांवर

गेल्या २४ तासांमध्ये ५२ हजार ५०९ रुग्णांची नोंद झाली असून ८५७ मृत्यू झाले आहेत. एकूण करोना रुग्णांची संख्या १९ लाख ८ हजार २५४ वर पोहोचली असून ३९ हजार ७९५ मृत्यू झाले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये ५१ हजार ७०६ रुग्ण बरे झाले. ५ लाख ८६ हजार २४४ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.