22 November 2019

News Flash

Video : बिग बींनी शेअर केला चिमुकल्या चाहतीचा व्हिडीओ

तिचा हा व्हिडीओ पाहून बिग बी प्रचंड भारावून गेले आहेत

अॅग्री यंग मॅन, शहेनशहा, बिग बी, महानायक अशा एक ना अनेक नावांनी लोकप्रिय असलेले अमिताभ बच्चन गेले कित्येक वर्ष चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. उत्तम अभिनय कौशल्य आणि संवादशैली यांच्या जोरावर त्यांनी त्यांचा स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण केला आहे. त्यांच्या या फॅनफॉलोअर्समध्ये लहानांपासून थोरापर्यंत साऱ्यांचा समावेश आहे. त्यातच एक लहानशी चिमुकलीदेखील त्यांची मोठी चाहती असल्याचं नुकतंच समोर आलं आहे. या चिमुकलीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून खुद्द बिग बींनी या चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अमिताभ यांच्या अशोक मिस्त्री नामक एका चाहत्याने त्याच्या लहान मुलीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ही लहान मुलगीदेखील आपल्या वडीलांप्रमाणेच अमिताभ यांची मोठी चाहती आहे. अशोक यांनी शेअर केलेला व्हिडीओ बिग बींनी रिट्विट केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या या चिमुकलीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये या लहान मुलीला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचे फोटो दाखविण्यात येतात. मात्र या साऱ्या कलाकारांपैकी ती केवळ अमिताभ बच्चन यांनाच ओळखते. तिचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर बिग बी प्रचंड भारावून गेल्याचं पाहायला मिळालं.त्यामुळे हा व्हिडीओ शेअर करुन बिग बींनी त्याला उत्तम कॅप्शनही दिलं आहे.

दरम्यान, आजवर असंख्य चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे बिग बी कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. त्यासोबतच अनेक वेळा गरजवंतांसाठी त्यांनी त्यांच्या मदतीचा हातदेखील पुढे केला आहे. त्यामुळे त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे.

First Published on June 18, 2019 5:14 pm

Web Title: amitabh bachchan little fan viral video ssj 93
Just Now!
X