भारतीय सिनेसृष्टीत फक्त प्रसिद्ध कलाकारांचीच नाही तर त्यांच्या मुलांचीही चर्चा असते. अनेकदा सिनेकलाकारांची मुलंही याच क्षेत्रात पदार्पण करतात. सोशल मीडियावरही त्यांचे अनेक चाहते असतात. अमिताभ बच्चन यांची नातं नव्या नवेली नंदा हिला सुद्धा भारतीय सिनेसृष्टीत तिचे करियर घडवण्याची इच्छा आहे. अभिनेते जावेद जाफरी यांच्या मुलासोबत अनेकदा तिचे नाव जोडले जाते. मिजान जाफरीसोबत ती अनेक कार्यक्रमांमध्ये दिसते.

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा व मिजान जाफरी एकत्र असल्याच्या अनेक चर्चा सध्या सिनेसृष्टीत आहेत. त्यांना बऱ्याच ठिकाणी  एकत्र पाहण्यात आले आहे. ‘मुंबई मिरर’च्या वृत्तानुसार, यासंबंधी मिजानला विचारले असता तो म्हणाला की, “आमचं फ्रेंड सर्कल एकच आहे. ती माझ्या बहिणीची खूप जवळची मैत्रीण आहे. सध्या मी कोणासोबतच रिलेशनमध्ये नाहीये.”

‘मलाल’ या चित्रपटातून संजय लीला भन्साळी यांची भाची शर्मिन सहगलसोबत मिजान सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. ‘पद्मावत’ चित्रपटासाठी मिजानने संजय भन्साळी यांना असिस्ट केले होते. ‘मलाल’ ही मुंबईतल्या चाळींमधील एक प्रेमकथा आहे. ट्रेलरमध्ये मिजान ‘शिवा’ या मराठी मुलाच्या भूमिकेत दिसतो. शर्मिन म्हणजेच ‘आस्था’च्या तो प्रेमात पडतो असे ट्रेलरमध्ये दिसते. ५ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.