पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'स्वच्छ भारत अभियाना'च्या आवाहनाला प्रतिसाद देत दस्तुरखुद्द अमिताभ बच्चनही यामध्ये सहभागी झाले आहेत. सकाळचा फेरफटका (मॉर्निंग वॉक) झाल्यानंतर बच्चन यांनी हातात झाडू घेऊन जुहू येथील आपल्या 'जलसा' या निवासस्थानाजवळील भागात साफसफाई केली आणि नागरिकांनाही स्वच्छतेचा संदेश दिला.बॉलीवूड अभिनेते सलमान खान, ह्रतिक रोशन यांच्यासोबतच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि उद्योगपती अनिल अंबानी हेसुध्दा याआधी 'स्वच्छ भारत अभियानात' सहभागी झाले आहेत.