News Flash

अमिताभ बच्चन यांना ‘हा’ आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

मानाच्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

बॉलीवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी चित्रपटसृष्टीत मोलाचं योगदान दिलं आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार या सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या पुरस्काराने सन्मानितही करण्यात आलं आहे. बॉलीवूडच्या या महानायकाचा सन्मान आता हॉलीवूडही करत आहे.

इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म अर्काईव्हसतर्फे दरवर्षी देण्यात येणारा प्रतिष्ठेचा समजला जाणारा 2021 चा एफआयएएफ पुरस्कार देण्यात येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

हॉलीवूडचे फिल्ममेकर मार्टीन स्कोर्सेस आणि ख्रिस्तोफर नोलन यांच्या हस्ते अमिताभ यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल.या दोघांनीही अमिताभ यांनी चित्रपटक्षेत्रात केलेल्या कामाचं कौतुक केलं आहे. अमिताभ यांनी भारतीय चित्रपट परंपरा अबाधित राखल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देत असल्याचं या दोघांनी म्हटलं आहे.

अमिताभ याविषयी म्हणतात, या वर्षीचा हा पुरस्कार मला मिळणं हा माझा सन्मान आहे. मी सदैव समर्पण भावनेनं काम करत राहीन.

अमिताभ बच्चन हे आयुष्मान खुरानासोबत गुलाबो सिताबो या चित्रपटात दिसले होते. लवकरच ते रुमी जाफरीच्या चेहरे या चित्रपटात इमरान हाश्मी सोबत दिसतील. रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्यासोबत त्यांचा ब्रम्हास्त्र हा सिनेमाही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय देवगणसोबत मेडे या चित्रपटातही ते दिसणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2021 4:12 pm

Web Title: amitabh bachchan received an international award by christopher nolan vsk 98
Next Stories
1 पाठक बाईंचा भन्नाट डान्स, मैत्रिणींसोबत अक्षयाची धमाल
2 पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, बबड्याची भावूक पोस्ट व्हायरल
3 ‘तिथे देखील भाजपाचे सरकार…’, पाकिस्तानला व्हॅक्सिन देण्यावर कंगनाचे ट्वीट चर्चेत
Just Now!
X