News Flash

काय झालं होतं अमिताभ यांना?; जाणून घ्या….

अमिताभ यांनी नुकतीच आपल्या ब्ल़ॉगवर नवी पोस्ट केली आहे

शनिवारी रात्री अमिताभ बच्चन यांनी आपल्यावर शस्त्रक्रिया होत असल्याची माहिती ब्लॉगवरून दिली होती. पण कोणती शस्त्रक्रिया, कशामुळे यापैकी कशाचाच उल्लेख त्यांनी या पोस्टमध्ये केला नव्हता. त्यामुळे त्यांच्या चाहत्यामध्ये चिंतेचं वातावरण होतं. पण आज सकाळीच अमिताभ यांनी ब्लॉग पोस्ट करत याबद्दल खुलासा केला आहे.

आजच सकाळी अमिताभ यांनी एक लांबलचक पोस्ट शेअर करत आपल्या शस्त्रक्रियेबद्दल माहिती दिली आहे. यात त्यांनी सांगितलं की त्यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या चाहत्यांचे आभारही मानले आहेत. “तुमच्या शुभेच्छांबद्दल आणि काळजीबद्दल धन्यवाद. या वयात डोळ्याची शस्त्रक्रिया करणं खूप नाजूक आणि कौशल्याचं काम असतं. या बाबतीत सर्वोत्तम उपचार मला मिळालेले आहेत आणि सगळं व्यवस्थित असल्याची मी आशा करतो. माजी दृष्टी आणि बरं होण्याचा वेग जरा कमी आहे, त्यामुळे या पोस्टमध्ये काही चुका असू शकतात. त्याबद्दल मला समजून घ्या”, अशा आशयाची एक पोस्ट त्यांनी आपल्या चाहत्यांसाठी शेअर केली आहे.

त्यांच्यावर अजून एक शस्त्रक्रिया लवकरच होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. जर सगळं व्यवस्थित पार पडलं तर विकास बहलसोबत मी माझ्या नवीन चित्रपटासाठी काम करणं सुरु करू शकेन, ज्याचं नाव सध्या तरी गुड बाय असं आहे.

अमिताभ सध्या ७८ वर्षांचे आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी “मेडिकल कंडिशन…..सर्जरी…मी लिहू शकत नाही”, अशी एक पोस्ट आपल्या ब्लॉगवर केली होती. त्यावर त्यांच्या चाहत्यांना अनेक प्रश्न पडले होते. त्याचबरोबर अमिताभ यांनी एक ट्विटही केलं होतं. “कुछ जरूरत से ज्यादा बढ गया है, पर काटने पर सुधरने वाला है. जीवन काल का कल है ये. कल ही पता चलेगा कैसे रहे वे”, असं ते ट्विट होतं.
अमिताभ लवकरच आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्यासोबत ‘ब्रम्हास्त्र’या चित्रपटात दिसणार आहेत. तर इम्रान हाश्मीसोबत ते ‘चेहरे’ या चित्रपटात दिसणार आहेत. दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या ‘झुंड’ या चित्रपटातही ते काम करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2021 1:52 pm

Web Title: amitabh bachchan reveals about the surgery he was undergoing vsk 98
Next Stories
1 आलियाची नवी झेप, स्वत:च्या प्रोडक्शन हाउसची सुरुवात
2 रिया चक्रवर्ती पुन्हा चर्चेत; नवा फोटो होतोय व्हायरल
3 शनाया कपूरच्या बेली डान्सचा जलवा, व्हिडीओ पाहून चाहते घायाळ
Just Now!
X