News Flash

दिवाळीतील फटाके फोडताना भाजला होता अमिताभ बच्चन यांचा हात

सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे.

सध्या लॉकडाउनमुळे सर्वजण घरात अडकून पडले आहेत. त्यात कलाकारांचा देखील समावेश आहे. पण सध्या लॉकाडउनमुळे मिळालेल्या काळात कलाकार सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सध्या बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चनही जुन्या आठवणी चाहत्यांसोबत शेअर करताना दिसत आहे. नुकताच त्यांनी सोशल मीडियाद्वारे दिवाळीमध्ये फटाके फोडताना हात भाजल्याचे सांगितले आहे.

अमिताभ यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिवाळीमध्ये हात भाजल्याचे सांगितले आहे. एकदा दिवाळीमध्ये फटाके फोडताना त्यांचा हात भाजला होता. हाताच्या बोटांची सतत हालचाल होणे गरजेचे असते. पण एकदा दिवाळीमध्ये फटाके फोडताना माझा हात भाजला होता. मला दोन महिन्यांपर्यंत हाताच्या अंगठ्याची हालचाल करता आली नव्हती. पण जरा विचार करा याच हाताचे बोट जेव्हा नीट होते तेव्हा किती कामांमध्ये मदत करते अशा आशयाचे कॅप्शन त्यांनी दिले आहे. या पोस्टमध्ये अमिताभ यांनी त्यांच्या हाताचा फोटो देखील शेअर केला आहे.

या पोस्टद्वारे अमिताभ यांनी अप्रत्यक्षपणे सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वांनी घरात बसायला हवे. काही दिवस घरात बसल्यानंतर सर्व काही सुरळीत होईल असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

काही दिवसांपूर्वी अमिताभ यांनी ‘डॉन’ या त्यांच्या गाजलेल्या चित्रपटाला ४२ वर्षे पूर्ण झाल्याचे सांगत सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला होता. या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला होता. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2020 12:46 pm

Web Title: amitabh bachchan reveals once he blew his hand due to diwali bomb avb 95
Next Stories
1 बमन इराणींनी फर्स्ट डेटलाच घातली होती लग्नाची मागणी
2 “माझ्या फिल्म कंपनीबद्दल अफवा पसरवू नका, अन्यथा…”; सलमान खान संतापला
3 ICUमधील पेशंटने पाहिली ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका, झाला खुश
Just Now!
X