18 February 2019

News Flash

‘बिग बी’ म्हणतात, मी नव्हे ती आहे आमच्या कुटुंबातील सर्वोत्तम कलाकार

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचा 'महानायक' असंही म्हणतात. मात्र या 'महानायकाला' ती सर्वोत्तम कलाकार वाटते.

अमिताभ बच्चन

बॉलिवूड म्हणजे बिग बी आणि बिग बी म्हणजे बॉलिवूड असं जणू समीकरणच गेल्या काही काळांपासून तयार झालं आहे. आत्ताचं बॉलिवूड हे बिग बीं शिवाय अपूर्ण आहे असंही अनेकजण म्हणतात. अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचा ‘महानायक’ असंही म्हणतात. मात्र या ‘महानायकाला’ आपली मुलगी श्वेता नंदा ही घरातील सर्वोत्तम नायिका वाटते.

अमिताभ यांनी नुकतीच एका मुलाखतीत श्वेताचं भरभरून कौतुक केलं. श्वेता ही आपल्या कुटुंबातील सर्वोत्तम अभिनेत्री असल्याचं बच्चन यांनी म्हटलं आहे. बिग बी यांनी पहिल्यांदाच श्वेतासोबत एका ज्वेलरी ब्रँडसाठी काम केलं होतं. त्यावेळी देखील तिच्या अभिनयाचं कौतुक केलं होतं. श्वेताला अभिनयाची चांगलीच जाण आहे. माझ्याकडे चित्रपटाची स्क्रिप्ट आली की मी ती अनेकदा श्वेताला दाखवतो. ती स्क्रिप्ट वाचूनच चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालणार की नाही हे श्वेता सांगते. तिचे तर्क अचूक असतात.

मी कोणते चित्रपट करावे, कशा प्रकारच्या भूमिकांची निवड करावी याविषयीचा सल्लाही श्वेता देते. चित्रपटांविषयी तिचं निरिक्षण खूपच अचूक असतं. एका कथेकडे पाहण्याचे तिचे दृष्टीकोन वेगळे आहेत आणि भूमिका साकारताना मला यासगळ्यांची खूपच मदत होते असं म्हणत बच्चन यांनी आपल्या वाढदिवशी तिचं कौतुक केलं.अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवशी श्वेतानं ‘पॅराडाइज टॉवर’ या आपल्या पहिल्या पुस्तकाचं अनावरण केलं.

First Published on October 12, 2018 12:06 pm

Web Title: amitabh bachchan says the best actor in the family is daughter