24 January 2021

News Flash

बिग बींनी ‘बाबा का ढाबा’ला केली लाखोंची मदत; केबीसीतील चर्चेनंतर झाला खुलासा

बिग बींनी 'बाबा का ढाबा'ला केली लाखोंची मदत

सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी दिल्लीमधील ‘बाबा का ढाबा’ चांगलाच चर्चेत आला होता. लॉकडाउनमुळे आर्थिक कंबरडं मोडलेल्या ८० वर्षीय कांता प्रसाद आणि त्यांच्या पत्नी बदामी देवी यांना मदत करण्यासंदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्यांच्या ढाब्यावर गर्दी करण्यास सुरुवात केली होती. विशेष म्हणजे ‘बाबा का ढाबा’ला मदत करणाऱ्यांमध्ये बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचाही सहभाग असल्याचं नुकतचं समोर आलं आहे.

बिग बी सुत्रसंचालन करत असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या टीव्ही शोमध्ये शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या भागात अभिनेत्री रवीना टंडन हॉटसीटवर होती. दरम्यान, एका प्रश्नावर चर्चा करताना बिग बी म्हणाले, “आता सोशल मीडियावर कोणत्याही विषयावर लोक खुलेपणाने बोलतात आणि मदतीसाठी पुढे येतात. लॉकडाउन दरम्यान, दिल्लीत ढाबा चालवणाऱ्या बाबांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना थोड्याच दिवसांत लोकांनी मदत केली” अशा प्रकारे या शोमध्ये ‘बाबा का ढाबा’वर चर्चा झाल्यानंतर बिग बींनी देखील या रेस्तराँला मदत केल्याचा खुलासा झाला.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, बिग बींनी आपल्या शोमध्ये बाबा का ढाबाचा उल्लेख केल्यानंतर त्यांनी ‘बाबा का ढाबा’चे कांता प्रसाद यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, “अमिताभ बच्चन यांनी एका व्यक्तीजवळ आमच्या मदतीसाठी ५.५० लाख रूपये पाठवले होते.”

दरम्यान, कांता प्रसाद आणि त्यांची पत्नी बदामी देवी यांनी मालविया नगरमध्ये ‘बाबा का ढाबा’ नावानेच नवीन रेस्तराँ सुरु केलं आहे. जिथे बाबा आता कॅश काऊंटर सांभाळतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2021 7:47 pm

Web Title: amitabh bachchan sent 5 50 lakhs rupees as help to baba ka dhaba dcp 98
Next Stories
1 ‘तापसीच माझी खरी चाहती’; कंगनाचा टोला
2 नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या ट्विटर हँडलवर मौनीचे बोल्ड फोटो; नंतर मागितली माफी
3 ‘बिग बॉस’मध्ये पहिल्यांदाच सलमान झाला भावूक, पाहा व्हिडीओ
Just Now!
X