News Flash

PHOTO अभिनेत्यांचा आलिशान आशियाना!

अभिनयसम्राटांची आलिशान घरे

अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अक्षय कुमार, सलमान खानसारख्या बॉलिवूड सुपरस्टार्सची एक झलक पाहण्यासाठी चाहते त्यांच्या घराबाहेर तासनतास ताटकळत असल्याचे दृश्य अनेकदा पाहायला मिळते. या सुपरस्टार्सनी घराबाहेर येऊन एकदा चाहत्यांना अभिवादन केले की उपस्थित चाहत्यांना जीवन सुफळ संपूर्ण झाल्याचा आनंद प्राप्त होत असल्याची अनुभूती येते. मुंबईत आलेल्या पर्यटकांना मुंबईतील प्रेक्षणीय स्थळ म्हणून यातील काही घरांचे दर्शनदेखील घडविले जाते. तर या अभिनयसम्राटांची आलिशान घरे आतून कशी दिसतात यावर छायाचित्रांच्या माध्यमातून एक नजर टाकू.

01-akshay-kumar-houseअक्षय कुमार – बॉलिवूडमध्ये ‘खिलाडी’ नावाने ओळखला जाणारा अभिनेता अक्षय कुमार मुंबईतील अंधेरी पश्चिम भागामधील लोखंडवाला संकुलात राहतो. पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्य करणाऱ्या अक्षयच्या घरात तळ मजल्यावर डायनिंग एरिया, स्वयंपाकघर, होम थिएटर आणि लिव्हिंग एरिया आहे. तर पहिल्या मजल्यावर अक्षयची पत्नी आणि अभिनत्री ट्विंकल खन्नाचे कार्यालय आहे. (photo source – youtube screenshot)

02-hrithik-house-insiderह्रतिक रोशन – मुंबईतील एका बहुमजली इमारतीत आठव्या, नवव्या आणि दहाव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये बॉलिवूड चित्रपट निर्माता राकेश रोशन यांचा सुपरस्टार पुत्र ह्रतिक रोशन वास्तव्यास आहे. ह्रतिकचे घर सर्व सुविधांनी परिपूर्ण आहे. (photo source – youtube screenshot)

03-amitha-bhachan-house-insider-sizeअमिताभ बच्चन – ‘बिग बी’ म्हणून ओळखले जाणारे बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची मुंबईत तीन घरे आहेत. ‘बिग बी’ कुटुंबासोबत ‘जलसा’ बंगल्यात राहतात. तर त्यांच्या अन्य घरांची नावे ‘प्रतिक्षा’ आणि ‘जनक’ अशी आहेत. अमिताभ यांचा मुलगा अभिषेक आणि सून ऐश्वर्या ‘प्रतिक्षा’मध्ये राहात असल्याचे जवळच्या सुत्रांकडून समजते. (photo source – youtube screenshot)

04-salman-khan-house-insider-sizeसलमान खान – मुंबईतील वांद्रे येथील ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’मध्ये बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता सलमान खानचे वास्तव्य आहे. सलमानसोबत त्याचे आई-वडीलदेखील येथेच राहातात. सलमानच्या घरात असलेल्या जीममध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांनी व्यायाम केला आहे. याव्यतिरिक्त सलमानचे पनवेलमध्ये फार्म हाऊसदेखील आहे. २० एकर जागेतील या फार्म हाऊसमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहेत. (photo source – youtube screenshot)

05-saif-ali-khan-house-insider-sizeसैफ अली खान – प्रसिद्ध माजी क्रिकेटर नवाब पतोडी यांचा मुलगा आणि अभिनेता सैफ अली खान पत्नी करीनासोबत मुंबईत वास्तव्यास असतो. याव्यतिरिक्त हरियाणात त्याचा एक वडिलोपार्जित महालदेखील आहे. हा महाल जवळजवळ ८० वर्षे जुना आहे. १९३५ मध्ये आठव्या नवाबाने या महालाची निर्मिती केल्याचे सांगितले जाते. सैफचे हे वडिलोपार्जित घर अतिशय भव्य आहे. (photo source – youtube screenshot)

06-shahrukhan-khan-mannatशाहरुख खान – बॉलिवूडमध्ये ‘किंग खान’ नावाने ओळखला जाणारा हा अभिनयाचा ‘बादशहा’ मुंबईतील वांद्रे येथील बँडस्टँड परिसरात राहतो. ‘मन्नत’ हा शाहरुख खानचा सहा मजली बंगला मुंबईतील एक विशेष आकर्षण आहे. बंगल्यात शाहरुखची एक मोठी लायब्ररी आहे. कार पार्किंग, लिव्हिंग रूम, गेस्ट रूमशिवाय बंगल्यात जीम आणि मनोरंजनासाठी एक खोली आहे. शाहरुखचे आलिशान घर आणि ‘किंग खान’ची एक झलक पाहाण्यासाठी त्याचे अनेक चाहाते शाहरुखच्या घराबाहेर गर्दी करून उभे असल्याचे बऱ्याचदा दृष्टीस पडते. २००१ साली शाहरुखने हे घर खरेदी केल्याचे बोलले जाते. (photo source – Indian Express)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 12:07 pm

Web Title: amitabh bachchan shah rukh khan salman khan akshay kumar hrithik roshan and saif ali khan inside bollywood superstars royal houses
Next Stories
1 Cannes Film Festival 2017: ..असा असेल यंदाचा ‘कान फिल्म फेस्टिव्हल’
2 ‘त्या’ व्यापाऱ्याविरोधात शिल्पा-राजने ठोकला १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा
3 ‘माझ्या मुलांनी माझ्या नावाचा फायदा घेण्यात गैर काय?’
Just Now!
X