बॉलिवूडचे शहेनशहा बिग बी अमिताभ बच्चन सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात रोज वेगवेगळ्या पोस्ट शेअर करून ते चाहत्यांशी संवाद साधतात. सध्या करोनाच्या काळात चाहत्यांचं मनोबल वाढवण्यासाठी बिग बींनी एक कविता पोस्ट केली आहे.

बिग बी अमिताभ बच्चन यांनी वडील डॉक्टर हरिवंश राय बंच्चन यांची कविता शेअर केली आहे. ” अकेलेपन का बल पहचान” असं या कवितेच नाव आहे. मनोबल वाढवणारी ही कविता पोस्ट करत ते म्हणाले ,”आदरणीय वडिलांची ही कविता. वेळ आणि परिस्थितीने जरी आपल्याला सर्वांना एकटं आणि असह्य केलं असेल. मात्र एकट्या पडलेल्या व्यक्तीच एकट्याचंदेखील प्रचंड असं बळ असतं. धीर ठेवा सर्व ठिक होईल. प्रार्थना आहे.” असं म्हणत त्यांनी ही कविता शेअर केली आहे.

बिग बींनी शेअर केलेल्या या कवितेत एकट्या पडलेल्या व्यक्तीचं वर्णन केलं आहे. “कुणी तुला टोकणारं नाही, कुणी तुला रोखणारं नाही, तू जाशील तीच वाट आणि दिशा आहे. एकटेपणाची ताकद ओळख..जेव्हा तुला वाटेल तेव्हा हसं, तुला वाटेल तेव्हा रड, हवं त्या अंदाजात गा.” असा या कवितेचा आशय आहे. बिग बींच्या या पोस्टला अनेकांनी पसंती दिली आहे.

नुकतच सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांना ट्रोल करण्यात आलं होतं. बिग बींनी अभिषेक बच्चनचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘बिग बुल’ सिनेमा पाहिल्यानंतर त्याचं सोशल मीडियावर एक पोस्ट करत कौतुक केलं होतं. अमिताभ यांची ही पोस्ट पाहून त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका यूजरने ‘तुम्ही हे काय केलं’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने ‘का मुलाची खोटी प्रशंसा करत आहात’ असे म्हणत बिग बींना ट्रोल केले आहे.