News Flash

दिव्यांग चाहत्याने पायाने काढले बिग बींचे चित्र

त्याने गुलाबो सिताबो मधील बिग बींच्या लूकचे चित्र काढले आहे.

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ते सतत सामाजिक विषयांवर त्यांचे मत मांडताना दिसतात. तसेच अनेकदा ते चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देखील देताना दिसतात. नुकताच बिग बींनी एका दिव्यांग चाहत्याने काढलेले चित्र शेअर केले आहे.

अमिताभ यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एका दिव्यांग चाहत्याने पायाने काढलेले चित्र शेअर केले आहे. हे चित्र शेअर करत त्यांनी, ‘हा आयुष आहे… दिव्यांग आहे. त्याने हे चित्र काढण्यासाठी हाताचा वापर केलेला नाही. त्याने पायाने हे चित्र काढले आहे. मला हे भेट म्हणून दे’ असे त्यांनी पुढे म्हटले आहे.

य़ा चाहत्याने काढलेले चित्र हे अमिताभ आणि अभिनेता आयुषमान खुराना यांच्या ‘गुलाबो सिताबो’ चित्रपटातील आहे. या चाहत्याने बिग बींचा चित्रपटातील लूक हुबेहुब चित्रामध्ये रेखाटला आहे. सोशल मीडियावर या चाहत्याची प्रशंसा केली जात आहे.

काही दिवसांपूर्वीच अमिताभ आणि आयुषमानचा ‘गुलाबो सिताबो’ हा चित्रपट अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात अमिताभ आणि आयुषमानची अनोखी जुगलबंदी पाहायला मिळाली. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजीत सरकार यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2020 1:44 pm

Web Title: amitabh bachchan share painting drawn by physically challenged fan avb 95
Next Stories
1 अमेरिकेचं ठरलं १५ जुलैला थिएटरचं पुनःश्च हरीओम… भारतात कधी?
2 आलिया-सोनमकडे चाहत्यांनी फिरवली पाठ; काही तासांत इतके लाख फॉलोअर्स झाले कमी
3 “जलसासमोर गर्दी करु नका”; बिग बींचे चाहत्यांना आवाहन
Just Now!
X