छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’ अर्थात ‘केबीसी’च्या १०व्या पर्वामध्ये अभिनेता अमिताभ बच्चन सूत्रसंचालकाची भूमिका पार पाडणार आहेत. त्यामुळे अमिताभ बच्चन पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतणार असल्याचं पाहायला मिळत आहे. चित्रपटसृष्टी असो किंवा छोट्या पडद्यावरील एखादा शो अमिताभ बच्चन सतत या-ना त्या मार्गाने चाहत्यांच्या भेटीला येत असतात. त्याप्रमाणेच ते सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. या सोशल मीडियाच्या माध्यमातून ते अनेक वेळात्यांची लेक श्वेता नंदाचं कौतुक करत असतात. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.
बिग बींनी ट्विटरच्या माध्यमातून एक फोटो शेअर केला असून या फोटोमध्ये त्यांनी एक जॅकेट परिधान केलं आहे. विशेष म्हणजे हे जॅकेट त्यांच्यासाठी खास असून या फोटोला त्यांनी ‘गर्ल पॉवर’ अशी टॅगलाईन दिली आहे. बिग बींनी परिधान केलेलं हे जॅकेट श्वेताने खास आपल्या वडीलांसाठी डिजाईन केलं आहे. त्यामुळे अमिताभ यांना या जॅकेटविषयी प्रचंड जिव्हाळा असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, अमिताभ यांनी पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये त्यांनी काळ्या रंगाचं जॅकेट घातलं असून ‘गर्ल पॉवर..एमएक्सएस वर्ल्डच्या कलेक्शनमधील एक हुडी. माझ्या घरातल्या एका पॉवरफुल व्यक्तीमत्वाने माझ्यासाठी खास डिजाईन केलेलं नवं गिफ्ट’, असं कॅप्शन अमिताभ यांनी या फोटोला दिलं आहे.
श्वेताने दिलेल्या या नव्या सरप्राईजमुळे बिग बी प्रचंड खुश असून त्यांना श्वेता आपली मुलगी असल्यावर गर्व असल्याचं म्हटलं आहे. श्वेताने हे जॅकेट डिझायनर मोनिशा जयसिंग हिच्यासह डिझाईन केलं असून काही दिवसापूर्वीच त्यांनी mxsworld नावाचा नवा ब्रॅण्ड सुरु केला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 28, 2018 11:44 am