News Flash

रणबीरच्या ‘अमृतभेटी’विषयी बिग बी म्हणतात..

अमिताभ यांनी रणबीरसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

अमिताभ बच्चन

गेल्या वर्षी अभिनेत्री आलिया भट्टच्या राजी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. राजीच्या यशानंतर आलिया आगामी ब्रह्मास्त्र चित्रपटाकडे वळली आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटामध्ये आलियाबरोबर अभिनेता आमिताभ बच्चन आणि रणबीर कपूरदेखील झळकणार आहे. काही दिवसापूर्वी चित्रपटाच्या सेटवर बिग बी आणि रणबीरने एक फोटो काढला. हा फोटो अमिताभ यांनी सोशल मीडियावर शेअर करुन रणबीरचे आभार मानले आहेत.

अमिताभ यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला असून या फोटोमध्ये त्यांच्यासोबत रणबीर कपूर झळकला आहे. या फोटोमध्ये दोघही कूल आणि हटके अंदाजात दिसत आहे. विशेष म्हणजे हा फोटो शेअर करत बिग बीं भावूक झाले असून त्यांनी याच स्वरुपाचं त्याला कॅप्शन दिलं आहे. विशेश म्हणजे ते या भेटीला ‘अमृतभेट’ म्हणाले आहेत.

‘आज हा फोटो पाहुन मला फार बरं वाटतं. माझ्या आयुष्यातली ही सर्वात मोठी भेट आहे. तुझे मनापासून आभार. आजही मी वयामध्ये शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहे, याची जाणीव मला या फोटोकडे पाहुन होते’, अशा आशयाचं कॅप्शन बिग बी यांनी या फोटोला दिलं आहे.

दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी यापूर्वीही अभिनेता आयुष्मान खुराना आणि राजकुमार राव यांची कौतुकाने पाठ थोपटली आहे. सध्या अमिताभ बच्चन ‘ब्रह्मास्त्र’मध्ये व्यस्त असून या चित्रपटाव्यतिरिक्त ते ‘झुंड’ या चित्रपटातही झळकणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 4:28 pm

Web Title: amitabh bachchan share ranbir kapoor photo and say thank you
Next Stories
1 कलाकाराने कलेशी प्रामाणिक राहायला हवे – सुबोध भावे
2 Video : Show Must Go On ! यामीचा आत्मविश्वास कौतुकास्पद
3 ‘लव्ह आज कल २’ मधून साराचा काढता पाय?
Just Now!
X