15 August 2020

News Flash

Video : जबराट! डान्स बघून येईल मायकल जॅक्सनची आठवण; बिग बी, हृतिकही झाले फिदा

दिग्दर्शक अभिनव सिन्हा यांनीदेखील या डान्सरचा व्हिडीओ शेअर केला आहे

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम या सोशल माध्यमाबरोबरच सध्या क्रेझ आहे ती टिक टॉकची. बच्चेकंपनीपासून ते आबालवृद्धांपर्यंत सगळ्यानाच टिक टॉपने मोहिनी घातली आहे. विशेष म्हणजे या टिक टॉकमुळे अनेकजण रातोरात प्रसिद्धी झोतातही आले. विष्णू प्रिया, राणू मंडल ही त्यापैकी काही नावं अनेकांच्या लक्षात राहिली. त्यानंतर आता टिक टॉकमुळे आणखी एक चेहरा प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. या टिक टॉक डान्सरची चक्क बिग बीं व ह्रतिक रोशननंही दखल घेतली आहे.

टिक टॉकवर सध्या बाबा जॅक्सन नामक व्यक्तीच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा डान्सर हुबेहूब मायकल जॅक्सनप्रमाणे डान्स करतो. त्यामुळे बऱ्याचदा त्याचा डान्स पाहिल्यानंतर मायकल जॅक्सन डोळ्यासमोर उभे राहतो. या डान्सरचा व्हिडीओ व्हायरल होऊन त्याची चर्चा बॉलिवूडपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे अभिनेता अमिताभ बच्चन आणि हृतिक रोशन यांनी त्याच्या डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत अमिताभ यांनी ‘व्वा’ असं म्हटलं आहे. तर ‘हा व्यक्ती नक्की आहे तरी कोण?’ असा प्रश्न हृतिकने विचारला आहे.


दरम्यान, यापूर्वी ‘आर्टिकल १५’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनव सिन्हा यांनीदेखील या डान्सरचा व्हिडीओ शेअर केला आहे. सोबतच त्यांनी नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझाला टॅग करत, ‘देखा क्या’ असं कॅप्शन दिलं. त्याचं हे कॅप्शन वाचल्यानंतर रेमोनेदेखील ‘भैय्या, नेक्स्ट फिल्म’ असं उत्तर दिलं आहे. त्यामुळे सध्या या डान्सरची भुरळ बॉलिवूड सेलिब्रिटींना पडली असून खरंच रेमो त्याला आगामी चित्रपटातून ब्रेक देणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2020 9:43 am

Web Title: amitabh bachchan share tik tok dance video getting viral on social media ssj 93
Next Stories
1 “बिग बी नाही तर साराकडून ‘ही’ गोष्ट शिकले”; दीपिकाचं सलमानला मजेशीर उत्तर
2 विश्वास पाटलांची ‘चंद्रमुखी’ आता मोठ्या पडद्यावर; प्रसाद ओक करणार दिग्दर्शन
3 तान्हाजी मालुसरे आणि माझ्यात कुठलेही साम्य नाही- अजय देवगण
Just Now!
X