बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ऑनलाईन ब्लॉग्स, फोटो, व्हिडीओ, ट्विट्स यांच्या माध्यमातून ते कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. यावेळी बिग बींनी गुजरात ट्युरिझमचा अनुभव सांगितला आहे. लक्षवेधी बाब म्हणजे हा अनुभव सांगण्यासाठी त्यांनी एका प्राण्याला खाणाऱ्या सिंहांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

“सुशांतच्या वडिलांकडे त्याचा फोन नंबर नव्हता”; अंकिता लोखंडेचा धक्कादायक खुलासा

अमिताभ गुजरात ट्युरिझमचे ब्रँड अम्बेसिडर होते. त्यावेळी एका जाहिरातीदरम्यान त्यांनी हे दृश्य पाहिलं होतं. “हे मी स्वत: पाहिलं होतं, गुजरात ट्युरिझमचं चित्रीकरण सुरु असताना आम्ही पाण्याच्या तलावाजवळ गेलो होतो. तिथे सिंहाचा एक ग्रुप पाणी पित होता. पण आम्हाला पाहून ते घाबरले व तिथून जाऊ लागले. तेवढ्यात आमच्यासोबत असलेल्या गावकऱ्यांनी त्यांना काठ्या दाखवून पुन्हा एकदा पाण्याजवळ नेलं. हे दृश्य पाहून मला गाई-गुरांची आठवण आली.” अशा आशयाचं ट्विट करुन बिग बींनी आपला अनुभव सांगितला आहे. त्यांचं हे ट्विट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

“दान नकोय आम्हाला काम हवय”; जेष्ठ अभिनेत्री महाराष्ट्र सरकारवर संतापल्या

अमिताभ बच्चन सध्या नानावटी रुग्णालयात करोनावर उपचार घेत आहेत. करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे ११ जुलै रोजी त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र रुग्णालयात असतानाही ते सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांच्या संपर्कात आहेत. त्यांना लवकरच बरं वाटावं यासाठी उज्जैन येथील प्रसिद्ध महाकालेश्वर ज्योर्तिंलिंग मंदिरात पूजा करण्यात आली. मंत्रोच्चाराच्या घोषात जलाभिषेक करण्यात आला असून महामृत्युंजय मंत्राचं पठण केलं गेलं. दरम्यान गेल्या २० दिवसांच्या उपचारानंतर बिग बींच्या तब्येतीत सुधार होत आहे. परिणामी लवकरच त्यांना रुग्णालयात घरी सोडले जाईल अशी शक्यता आहे.