01 March 2021

News Flash

बिग बींसोबतच्या ‘या’ चिमुकल्याला ओळखलंत का? आज आहे सुपरस्टार

अमिताभ यांनी शेअर केला १९७९ सालचा फोटो

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ते सतत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असतात. नुकताच त्यांनी एक जूना फोटो शेअर केला आहे. हा फोटो चित्रपटाच्या सेटवरील असल्याचे म्हटले जात आहे. पण या फोटोमध्ये दिसत असलेल्या लहान मुलाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा चिमुकला आहे तरी कोण ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

अमिताभ यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा ब्लॅक अॅण्ड व्हाइट फोटो शेअर केला आहे. हा फोटो १९७९ साली प्रदर्शित झालेल्या ‘मिस्टर नटवरलाल’ चित्रपटाच्या सेटवरील आहे. या चित्रपटात अमिताभ यांनी पहिल्यांदाच गाणे गायले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

हा फोटो शेअर करत अमिताभ यांनी ‘मी पहिल्यांदाच एका चित्रपटासाठी गाणे गायले होते. मिस्टर नटवरलाल चित्रपटात मी, मेरे पास आओ हे गाणे गायले. संगीत दिग्दर्शक राजेश रोशन यांच्या सोबत रिहर्सल करत होतो. आमच्यासोबत बसलेला हा मस्तीखोर मुलगा हृतिक रोशन आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा- KBC: बिग बींच्या “त्या” विनंतीमुळे पोलीस कॉन्स्टेबल पती-पत्नी आले एकत्र

बिग बींनी शेअर केलेल्या फोटोमध्ये हृतिक रोशनला ओळखणे देखील कठीण झाले आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चाहते त्यावर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2021 1:20 pm

Web Title: amitabh bachchan shared the 1979 picture with todays bollywood superstar today avb 95
Next Stories
1 ‘मी सुद्धा हिंदू आहे आणि या दृश्याने…’, तांडवच्या वादात स्वराची उडी
2 ‘तांडव’ शांत! वेब सीरिजमधील ‘ते’ वादग्रस्त दृश्य हटवणार
3 आई झाल्यानंतर अनुष्काने केली पहिलीच पोस्ट, म्हणाली…
Just Now!
X