20 January 2021

News Flash

महानायकाचा स्वॅग; बिग बींनी शेअर केला कधीही न पाहिलेला तरुणपणीचा फोटो

"स्टायलिश फोटोशूट केलं पण हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही"

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ऑनलाईन ब्लॉग्स, फोटो, व्हिडीओज, ट्विट यांच्या माध्यमातून ते कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. यावेळी बिग बी एका फोटोशूटमुळे चर्चेत आहेत. त्यांनी प्रदर्शित न झालेल्या एका चित्रपटातील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हायरल होणारा फोटो सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – शेतकरी आंदोलनाला बॉलिवूड गायिकेचा पाठिंबा; म्हणाली…

“हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. चित्रपटासाठी असं स्टाईलिश फोटोशूट मी केलं होतं.” अशा आशयाची कॉमेंट लिहून बिग बींनी तो फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

अमिताभ बच्चन हे आज बॉलिवूडमधील महानाय म्हणून ओळखले जातात. परंतु करिअरच्या सुरुवातील त्यांनी अनेक बी ग्रेड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. त्यापैकी काही चित्रपटांची निर्मिती अर्ध्यांवरच थांबली तर काही प्रदर्शित देखील झाले नाहीत. हा देखील अशाच चित्रपटांपैकी एक आहे. या फोटोच्या माध्यमातून अमिताभ यांनी आपल्या जुन्या आठवणींना पुन्हा एकदा नव्याने उजाळा दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2020 3:52 pm

Web Title: amitabh bachchan shares his throwback photo mppg 94
Next Stories
1 जॅकलीन आणि अक्षय या चित्रपटात पुन्हा करणार एकत्र काम
2 KBC 12: शोले चित्रपटाशी संबंधीत विचारलेल्या या प्रश्नासाठी स्पर्धकाने घेतली लाइफलाइन
3 ‘मी तर जन्मत:चं मूर्ख’; शेहला रशीद प्रकरणात कंगनाची उडी
Just Now!
X