09 August 2020

News Flash

अमिताभ बच्चन यांनी कवितेतून केला डॉक्टरांना सलाम

मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अमिताभ बच्चन

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना शनिवारी करोनाची लागण झाली. मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बिग बींनी ट्विटरवर स्वत: याबद्दलची माहिती दिली. रुग्णालयात असले तरी बिग बी सोशल मीडियावर सक्रिय आहेत आणि त्यांनी ट्विटरवर एक कविता पोस्ट करत डॉक्टर व नर्सेसना सलाम केला आहे.

अमिताभ बच्चन यांची कविता-

श्वेत वर्ण आभूषण
सेवा भाव समर्पण
ईश्वर रुपी देवता ये
पीडितों के संबल ये
स्वयं को मिटा दिया
गले हमें लगा लिया
पूजा दर्शन के स्थान ये
परचम इंसानियत के

स्वत:च्या जिवाची पर्वा न करता करोनाच्या संकटातही रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टर्ससाठी त्यांनी या ओळी लिहिल्या आहेत. इतरांची सेवा करणारे हे डॉक्टर व नर्सेस पूजनीय असल्याचं त्यांनी या कवितेत म्हटलंय.

अमिताभ बच्चन यांच्यासोबतच अभिषेकसुद्धा रुग्णालयात दाखल आहे. हे दोघंही उपचारांना चांगला प्रतिसाद देत असून कमीत कमी सात दिवस तरी त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयाने दिली. तर ऐश्वर्या राय बच्चन व आराध्या यांना घरातच क्वारंटाइन करण्यात आले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 11:32 am

Web Title: amitabh bachchan shares tribute for doctors from hospital ssv 92
Next Stories
1 ‘मला प्रसूती कळा सुरु असताना नवाज गर्लफ्रेंडसोबत बोलत होता’; पत्नीने केला नवा आरोप
2 अग्रिमा जोशुआला बलात्काराची धमकी देणाऱ्या ‘उमेश दादा’ला मुंबई पोलिसांकडून अटक
3 ….अन् अशी मिळाली शैलेश लोढाला ‘तारक मेहता’ची भूमिका
Just Now!
X