बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ऑनलाईन ब्लॉग्स, ट्विट्स, इन्स्टा पोस्ट, फोटो, व्हिडीओज यांच्या माध्यमातून ते कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. यावेळी त्यांनी आपल्या चाहत्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ‘अग्निपथ’ चित्रपटातील कविता पोस्ट केली आहे. त्यांची ही कविता सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
अवश्य पाहा – तुफान व्हायरल होणारं ‘हे’ भोजपुरी गाणं तुम्ही पाहिलंय का?
बिग बींनी चाहत्यांना गुड मॉर्निंग करणारा एक फोटो पोस्ट केला. “सकाळचा आनंद, कायम सावधान राहा, संकटांशी दोन हात करण्यासाठी तयार राहा, सर्व काही ठिक होईल. अशा आशयाची पोस्ट त्यांनी या फोटोवर लिहिली आहे. तसेच यापुढे त्यांनी ‘अग्निपथ’ कवितेच्या दोन ओळी लिहिल्या आहेत. “तू न झुकेगा कभी; तू न थमेगा कभी, तू न झुकेगा कभी; तू न थमेगा कभी, कर शपथ, कर शपथ, कर शपथ, अग्निपथ अग्निपथ अग्निपथ”
अवश्य पाहा – “आओ हंसते-हंसते, जाओ हंसते-हंसते”; जगदीप यांचा थ्रोबॅक व्हिडीओ व्हायरल…
देशभरातील लोक सध्या करोनामुळे त्रस्त आहेत. लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. परिणामी देशभरात काहीसे नैराश्येचे वातावरण आहे. आशा प्रतिकूल परिस्थितीत आपल्या चाहत्यांना प्रोत्साहित करण्यासाठी बिग बींनी ही कविता पोस्ट केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 9, 2020 12:02 pm