News Flash

‘कौन बनेगा करोडपती-८’च्या प्रोमो चित्रीकरणास सुरुवात

बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपती'च्या आठव्या सत्राच्या प्रोमोच्या चित्रीकरणास सुरुवात केली आहे. या ७१ वर्षीय जेष्ठ अभिनेत्याने 'कौन बनेगा करोडपती'च्या सहा सत्रांचे...

| April 14, 2014 03:13 am

बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांनी ‘कौन बनेगा करोडपती’च्या आठव्या सत्राच्या प्रोमोच्या चित्रीकरणास सुरुवात केली आहे. या ७१ वर्षीय जेष्ठ अभिनेत्याने ‘कौन बनेगा करोडपती’च्या सहा सत्रांचे सूत्रसंचालन केले होते, तर तिसऱ्या सत्राचे सूत्रसंचालन शाहरूख खानने केले होते. अमिताभ बच्चन आपल्या ब्लॉगवर लिहितात, “सकाळी लवकर ‘केबीसी’च्या नव्या सत्राच्या प्रोमोचे चित्रीकरण पूर्ण केले. …त्यानंतर मेहमुद भाईंचे भाऊ आणि प्रिय मित्र अन्वर अली यांनी साकारलेली ‘बॉम्बे टू गोवा’ची सुधारित आवृत्ती पाहाण्यासाठी पीव्हीआरला पोहोचलो… वाहतुकीशी झटापट करत आणखी एका प्रिय मित्राचे अभिनंदन करायला गेलो, जे आता कुटुंबाचा भागदेखील झाले आहेत, प्रेम चोप्रा ज्यांनी आत्मचरित्र प्रकाशित केले आहे…” यानंतर अमिताभ बच्चन यांनी कुटुंबियांसमवेत भूतनाथ रिटर्न्स चित्रपट पाहिला. शिवाय नव्या चित्रपटासंदर्भात बाल्कींची भेटदेखील घेतली, या चित्रपटाचे आठवडाभरात चित्रीकरण सुरू होणार आहे. बिग बींचा आठवड्याचा शेवट हा व्यस्त होता म्हणायचं तर!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2014 3:13 am

Web Title: amitabh bachchan starts promo shoot of kaun banega crorepati 8
Next Stories
1 धर्मेन्द्र करणार पत्नी हेमा मालिनीचा निवडणूक प्रचार!
2 पाहाः ‘तू ही तो है’ गाण्यात ‘खिलाडी’ सोनाक्षी
3 फोटो अल्बम : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगची ‘संडे डिनर डेट’
Just Now!
X