बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ऑनलाईन ब्लॉग्स, ट्विट, फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ते कायम चर्चेत असतात. यावेळी अमिताभ चक्क गुलाबजाम आणि रसगुल्ला या गोड पदार्थांमुळे चर्चेत आहेत. बिग बींनी इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांच्या एका हातात गुलाबजाम दिसतोय तर दुसऱ्या हातात रसगुल्ला.
अवश्य पाहा – सोज्वळ सुनेचा बिकिनी अवतार; हॉट फोटोशूटमुळे चाहते अवाक
“जेव्हा गोड पदार्थ खाणं थांबवलं तेव्हा या शूटिंगवाल्यांनी माझ्या हातात गुलाबजाम आणि रसगुल्ला दिला. अन् म्हणतायेत या पदार्थांची चव सांगणारं एक्सप्रेशन द्या. आयुष्यात यापेक्षा मोठा टॉर्चर होऊच शकत नाही.” अशा आशयाची कॅप्शन देत अमिताभ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
अवश्य पाहा – अरे बापरे… ही अभिनेत्री एका फोटोशूटसाठी घेते २०० कोटी
View this post on Instagram
अवश्य पाहा – “शीख, मुस्लिम, हिंदू प्रत्येक जण माझ्या विरोधात”; कंगनाने व्यक्त केलं दु:ख
यापूर्वी बिग बी कानांच्या कवितेमुळे चर्चेत होते. या कवितेद्वारे त्यांनी आपल्या कानांचं मनोगत सांगण्याचा प्रयत्न केला होता. कान जर खरंच बोलू लागले तर ते काय बोलतील? स्वत:च्या समस्या कशा सांगतील? हे त्यांनी या कवितेद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला. “मैं हूँ कान… हम दो हैं… जुड़वां भाई…, लेकिन हमारी किस्मत ही ऐसी है, कि आज तक हमने अपने दूसरे, भाई को देखा तक नहीं” अशी कविता त्यांनी पोस्ट केली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 19, 2020 11:16 am