महिला सशक्तिकरणचे नेहमीच समर्थन करणारे अमिताभ बच्चन यांनी ‘ग्लोबल सिटीजन फेस्टिवल ऑफ इंडिया’च्या उद्घाटनावेळी त्यांनी परत एकदा याची आठवण करुन दिली. ते म्हणाले की, एक देश म्हणून आपला महिलांचा आपल्याला अभिमान असलाच पाहिजे. आपल्या संस्कृतीला एक इतिहास आहे. पण आता तोही झपाट्याने बदलत आहे. का एखाद्या स्त्रीने पुरुषाच्या १० पाऊलं मागेच चालले पाहिजे. अशी अनेक कारणं आहेत जी अशा गोष्टी बदलायला पूरक आहेत. आपल्या देशाची ५० टक्के शक्ती ही महिला असल्या पाहिजेत. त्यांना समाजात योग्य मान, सन्मान आणि प्रतिष्ठा ही मिळाली पाहिजे. यासाठी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.
‘कौन बनेगा करोडपती’ या नावाजलेल्या शोच्या दिवसांची आठवण काढत ते म्हणाले. “या शोचे सूत्रसंचालन करत असताना मी एकदा ३२ वर्षीय मुलीला भेटलो. ती एका खेड्यातून आली होती. ती मला म्हणाली की ती सातवी, आठीमध्ये असताना तिचे शिक्षण थांबवले गेले. तिच्या वडिलांनी तिला सांगितले की ते तिला याहून जास्त शिकवू शकत नाहीत, एक दिवस तिचे लग्न होणार म्हणून गावातल्या लोकांनी त्यांना मुलीच्या शिक्षणावर याहून जास्त पैसा खर्च न करण्याचा सल्ला दिला. त्या मुलीने या विरोधात आवाज उठवला.”

kbc-raipur
“तिने तिचे राहते घर सोडून आजीकडे राहणं पसंत केलं. तिथे गेल्यावरही तिला कमीच लेखले जायचे. तिला दिलेली कोणतीही कामं करावी लागायची. अशा परिस्थितीतही तिने शिक्षण घेतले आणि शेवटी कौन बनेगा करोडपतीमध्ये आली. तिने या खेळात २५ लाख रुपये जिंकले. जेव्हा मी तिला विचारले की तू या रकमेचं काय करणार तेव्ही ती म्हणाली की ती हा धनादेश आपल्या वडिलांना देणार आणि त्यांना सांगणार की ती स्वतःही त्या कुटुंबाची एक संपत्तीच आहे.” अमिताभ यांनी सर्वसामान्य जनतेलाही यात सहभागी होण्यास सांगितले आणि समाजात एक चांगला बदल घडवून आणण्यासाठी एकत्र उभे राहण्याची विनंती केली.