News Flash

Video: टिक टॉकवर ‘अमिताभ’चा व्हिडिओ व्हायरल; २४ तासांत २० लाख लोकांनी पाहिला

‘टिक टॉक 'अमिताभ'चा सोशल मीडियावर धुमाकूळ

महानायक अमिताभ बच्चन बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखले जातात. त्यांच्या सारखा अभिनय करणं, प्रसिद्धी मिळवणं, लोकांच्या फॅन लिस्टमध्ये राहणं हे सिनेसृष्टीत करिअर करु इच्छिणाऱ्या जवळपास प्रत्येक कलाकारचं स्वप्न असतं. परंतु प्रत्येकाचं हे स्वप्न अस्तित्वात येतंच असं नाही. मग ही मंडळी फेसबुक, युट्युब, इन्स्टाग्राम, टिकटॉक अशा माध्यमातून ते स्टारडम मिळवण्याचा प्रयत्न करतात. असाच एक कलाकार सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

हा कलाकार अमिताभ बच्चन यांची हुबेहुब नक्कल करतो. आश्चर्याची बाब म्हणजे तो बिग बींसारखाच दिसतो. या कलाकारनं आपलं खरं नाव अद्याप जाहीर केलेलं नाही. त्यामुळे त्याला टिकटॉकचा अमिताभ असं म्हटलं जातं. त्याने आपलं टिकटॉक अकाऊंट ‘अमिताभ बच्चन स्टार’ या नावाने सुरु केलं आहे. त्याचे सोशल मीडियावर एक लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

त्याने नुकताच पोस्ट केलेला ‘हो कोई गुलाम’ हा टिकटॉक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अगदी काही तासांत हा व्हिडीओ २० लाखांपेक्षा अधिक वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडीओवर एक लाखांपेक्षा अधिक लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 5:23 pm

Web Title: amitabh bachchan tik tok video ho koi gulam mppg 94
Next Stories
1 कामसूत्र फेम ‘या’ अभिनेत्रीला झाली करोनाची लागण
2 जेव्हा सलीम खान यांनी सांगितलं होतं सलमानच्या फसलेल्या रिलेशनशिप्समागील खरं कारण
3 शिवा होऊ देईल का सोनी-सरकारचं लग्न?
Just Now!
X