20 September 2020

News Flash

जेम्स बॉण्डच्या स्टायलिश अंदाजात बिग बी!

अमिताभ बच्चन लवकरच हॉलिवूडमधील प्रसिद्ध जेम्स बॉण्डच्या स्टायलिश अंदाजात दिसणार आहेत.

आपल्या काळातील अन्य अभिनेत्याच्या तुलनेत सर्वाधिक सक्रिय असलेले बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन लवकरच हॉलिवूडमधील प्रसिद्ध जेम्स बॉण्डच्या स्टायलिश अंदाजात दिसणार आहेत. बॉण्डच्या स्टायलिश लूकमध्ये दिसणाऱ्या बिग बींच्या आजूबाजूला सुंदर ललनादेखील ओघाने दिसणारच. आपण जॅम्स बॉण्डचा लूक धारण करणार असल्याची माहिती अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अधिकृत ब्लॉगमधून दिली आहे. आपण एका मासिकासाठी फोटोशूट करणार असून, अनेक सुंदऱ्यांनी घेरलेल्या जेम्स बॉण्डसारखा हा लूक असणार असल्याचे त्यांनी या ब्लॉगमध्ये म्हटले होते. अशाप्रकारचे रुप धारण करणे या वयात महानायकासाठी थोडे अवघडल्यासारखे असले तरी बिग बी आपल्या ब्लॉगमध्ये लिहितात, काहीही असले तरी सर्वसाधारणपणे वयाच्या ७४ व्या वर्षी अशी संधी कोणाला मिळत नाही. म्हणून ही व्यक्तिरेखा धारण करण्याची मजा घेऊया.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2016 3:38 pm

Web Title: amitabh bachchan to feature in james bond inspired look
टॅग Bollywood,Hollywood
Next Stories
1 बिपाशा आणि करणच्या लग्नाचा मुहूर्त ठरला?
2 ‘सरबजीत’मधील गाण्यासाठी ऐश्वर्याचा पारंपरिक पंजाबी लूक
3 जॅकलीनचा ‘ढिशूम’मधील फर्स्टलूक!
Just Now!
X