अमिताभ बच्चन पुन्हा एकदा आपल्या वडिलांच्या कवितांचे वाचन करण्यास सज्ज झाले आहेत.
७१ वर्षीय अमिताभ यांनी यापूर्वीही वडिल हरिवंशराय बच्चन यांच्या कवितांचे वाचन केले होते. आता यावेळी करण्यात येणारे कवितांचे कथन हे डिजिटलीसुद्धा सुसज्ज असणार आहे. “माझ्या वडिलांनी केलेल्या कवितांच्या वाचनावर सध्या काम सुरु आहे. पॅरिस येथील डू चॅम्पस एलीस थेटरच्या मंचावर हा कार्यक्रम होईल. तसेच, त्यावेळी काही डिजीटल प्रयोगही करण्यात येतील.मात्र, याबाबत आता काही बोलणे योग्य राहणार नाही,” असे अमिताभ यांनी ब्लॉगवर लिहले आहे. याचसोबत अमिताभ हे सध्या त्यांच्या आगामी मालिका ‘युद्ध’ आणि ‘पिकु’, ‘टू’ या चित्रटपटांच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत.