दिवाळी हा आनंदाचा, उत्साहाचा, जगण्याची नवीन उभारी देणारा सण! दिवाळी हा शब्द जरी उच्चारला, तरी आपल्या अंगात उत्साह संचारतो. सध्या सर्वत्र दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. प्रत्येक जण एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छाही देत आहेत. यामध्ये कलाविश्वातील काही कलाकारांनी त्यांच्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता अमिताभ बच्चन यांनी पत्नी जया बच्चन आणि मुलगी श्वेता बच्चन यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करुन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्याप्रमाणेच अभिनेता ऋषि कपूर यांनीही ”दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा”, असं म्हटलं आहे.

”यंदाची दिवाळी फटाक्यांऐवजी दिव्यांच्या प्रकाशात साजरी करा”,असं म्हणत अभिनेता बोमन इराणी यांनी शुभेच्छा दिल्या. सोबतच अभिनेत्री मलायका अरोरा हिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

Happy Diwali

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

दरम्यान,या कलाकारांप्रमाणेच कलाविश्वातील अनेकांनी चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.