News Flash

“या पैशांनी गरीबांची मदत करा”; नव्या कारमुळे बिग बींना केलं जातय ट्रोल

अमिताभ बच्चन यांनी खरेदी केली कोट्यवधींची ‘मर्सिडिज-बेन्झ’

अमिताभ बच्चन (संग्रहित प्रतिकात्मक छायाचित्र)

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ऑनलाईन ब्लॉग्स, फोटो, व्हिडीओज, ट्विट यांच्या माध्यमातून ते कायम चर्चेत असतात. मात्र यावेळी अमिताभ एका कारमुळे चर्चेत आहेत. बिग बींनी एक नवी कोरी ‘मर्सिडिज-बेन्झ’ कार खरेदी केली आहे. परंतु कोट्यवधी रुपयांच्या या लक्झरी कारमुळे बिग बींना ट्रोल केलं जात आहे. जर इतके पैसे आहेत तर गरीबांची मदत करा असं म्हणत नेटकऱ्यांनी आपला राग व्यक्त केला आहे.

अमिताभ बच्चन यांच्या नव्या कारचे फोटो सध्या सोशल मीडियावर जारदार व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये बिग बी हातात गाडीची चावी घेऊन उभे आहेत. मात्र हे फोटो काही नेटकऱ्यांना आवडले नाही. संपूर्ण देश सध्या करोना विषाणूमुळे त्रस्त आहे. लॉकडाउनमुळे लोक बेरोजगार झाले आहेत. देशभरातील अनेक लोक आज एक वेळच्या अन्नासाठी संघर्ष करत आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत बिग बींनी गरीबांना मदत करण्याऐवजी कार खरेदी केली, अशी टीका त्यांच्यावर सोशल मीडियाद्वारे केली जात आहे. दरम्यान एका नेटकऱ्याने त्यांची तुलना अभिनेता सोनू सूदशी देखील केली आहे. “एके ठिकाणी सोनू सूद मजुरांना मदत करतोय तर दुसऱ्या ठिकाणी अमिताभ कार खरेदी करुन पैसे उधळत आहेत.” अशी टीका त्या नेटकऱ्याने केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2020 4:14 pm

Web Title: amitabh bachchan troll on social media due to new car mppg 94
Next Stories
1 कंगनाचा करण जोहरवर निशाणा, म्हणाली…
2 “तिला कामच करायचं नाहीये”; शिल्पा शिंदेच्या आरोपांवर अभिनेत्याचं प्रत्युत्तर
3 ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेत होणार डॉ. अमोल कोल्हेंची एण्ट्री; साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका
Just Now!
X