बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ऑनलाईन ब्लॉग्स, फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ते कायम चर्चेत असतात. यावेळी ते एका ट्विटमुळे चर्चेत आहेत. या ट्विटद्वारे त्यांनी आयुष्यातील कटू सत्य सांगितलं आहे. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

“जेव्हा तुम्ही संघर्ष करत असता तेव्हा कोणीही तुमच्यासोबत नसतं. पण जेव्हा तुम्ही यशस्वी होता तेव्हा कोणालाही आमंत्रण देण्याची गरज भासत नाही.” अशा आशयाचं ट्विट बिग बिंनी केलं आहे. या ट्विटद्वारे त्यांनी आपल्या चाहत्यांना यश मिळवण्यासाठी प्रेरणा दिली आहे. अमिताभ नेहमीच असे प्रेरणादायी विचार ट्विट करत असतात. या पार्श्वभूमीवर त्यांचे हे ट्विट सध्या चर्चेच आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

यापूर्वी अमिताभ ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमुळे चर्चेत होते. बिग बी ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर परतले आहेत. करोनाचा वाढता संसर्ग आणि त्यामुळे झालेली टाळेबंदी यामुळे ‘केबीसी’च्या या १२ व्या पर्वाचे काम रखडले होते. टाळेबंदीच्या काळात अमिताभ यांनी घरीच के बीसीसाठी नोंदणीचे आवाहन करणाऱ्या प्रोमोचे चित्रण केले होते. मालिकांच्या चित्रीकरणाला परवानगी देण्यात आल्यानंतरही ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या कलाकारांना चित्रीकरणात सहभाग घेण्यास निर्बंध घालण्यात आले होते. मात्र उच्च न्यायालयाने याप्रकरणीचे निर्बंधही रद्द केल्याने आता सगळेच अडथळे दूर होऊन केबीसीच्या सेटवर परतणे अमिताभ यांना शक्य झाले आहे. दरम्यान बिग बींनी सेटवरील काही फोटो देखील पोस्ट केले आहेत.