ट्विटर अकाऊंटवर अमिताभ बच्चन हे खूपच सक्रीय असतात. चालू घडामोडी असतील किंवा एखाद्या विषयावरील त्यांचे मत असेल, बिग बी ट्विटवर सातत्याने व्यक्त होत असतात. मात्र, मंगळवारी त्यांनी केलेल्या एका ट्विटने नेटकऱ्यांनाही बुचकळ्यात पाडले. त्या ट्विटमधून बिग बींना नेमके काय म्हणायचे आहे, याचा शोध लावत अनेकांनीच मजेशीर रिप्लायसुद्धा दिले आहेत.

अमिताभ यांनी ट्विटरवर फक्त ‘छान’ (Nice) असा शब्द पोस्ट केला. आता हे त्यांनी कोणाला म्हटले, कशासाठी म्हटले हे, फक्त छान असा एकच शब्द का ट्विट केला, असे एक ना हजार प्रश्न त्यांच्या फॉलोअर्समध्ये उपस्थित झाले. काहींनी त्यांना कारणही विचारले तर काहींनी मजेशीर मीम्स तयार करून पोस्ट केले. आता त्या ट्विटचा नेमका काय अर्थ होता, हे बिग बी स्वत:च सांगू शकतील.

वाचा : सोनाक्षी सिन्हावर रत्ना पाठक शहा यांची सडकून टीका

विशेष म्हणजे कोणताही संदर्भ न लागणाऱ्या या बिग बींच्या ट्विटला भरभरून लाईक्सही मिळाले आहेत. काही दिवसांपूर्वी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीदेखील ट्विटरवर फक्त ‘म’ (M) असे लिहिले होते आणि त्यावरूनही नेटकऱ्यांमध्ये चांगलाच संभ्रम निर्माण झाला होता.