20 February 2018

News Flash

बिग बींनी ३० वर्षांनंतर सांगितले ‘हे’ गुपित

अमिताभ बच्चन यांच्यावर तेव्हा सिनेसृष्टीला फारसा विश्वास नव्हता

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: February 13, 2018 7:27 PM

महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ‘शहेनशहा’ सिनेमाशीसंबंधीत एक मोठे गुपित उघडले आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून हे गुपित सुमारे ३० वर्षांनी सर्वांसोबत शेअर केले आहे. अमिताभ बच्चन यांच्यावर तेव्हा सिनेसृष्टीला फारसा विश्वास नव्हता. त्यांचा विश्वासार्हतेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. यावरुनच ‘शहेनशहा’ सिनेमाचे प्रदर्शन करायचे की नाही याबाबत निर्माते संभ्रमात होते. बिग बी यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘शहेनशाहची ३० वर्षे. फार सुंदर काळ होता. एक वेळ अशी होती की या सिनेमाचे प्रदर्शन होणार की नाही हे माहित नव्हते. पण सिनेमाने चांगले बॉक्स ऑफिस करत एक यशस्वी सिनेमा झाला. धन्यवाद.’

टीनू आनंद दिग्दर्शित ‘शहेनशहा’ सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत मिनाक्षी शेषाद्री आणि अमरीश पुरी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. या सिनेमाची पटकथा जया बच्चन यांनी लिहिली होती. अमिताभ यांच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर ते लवकरच ‘१०२ नॉट आऊट’ सिनेमात दिसणार आहेत. या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमातून अमिताभ आणि ऋषी यांची जोडी २७ वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. ‘अमर अकबर अँथनी’ सिनेमात बिग बी आणि ऋषी यांनी सख्ख्या भावांची व्यक्तिरेखा साकारली होती. या सिनेमात अमिताभ ऋषी यांचे वडील दाखवण्यात आले आहेत.

या सिनेमाशिवाय बिग बी ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ सिनेमात आमिर खान, कतरिना कैफ आणि फातिमा सना शेखसोबत दिसतील. यानंतर ते रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत ‘ब्रम्हास्त्र’ सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.

First Published on February 13, 2018 7:27 pm

Web Title: amitabh bachchan tweeted shahenshah had little hope for release
  1. No Comments.