30 May 2020

News Flash

बिग बींनी दिल्या मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा; झाले ट्रोल

संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ओळी पोस्ट करत बिग बींनी मराठीत केलं ट्विट

अमिताभ बच्चन

कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. २७ फेब्रुवारी रोजी हा दिवस उत्साहात साजरा झाला. मात्र अमिताभ बच्चन यांनी २७ ऐवजी २८ फेब्रुवारी रोजी ट्विटरच्या माध्यमातून मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ओळी पोस्ट करत त्यांनी या शुभेच्छा दिल्या. मात्र एक दिवस उशीरा या शुभेच्छा दिल्याने नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे.

बिग बींनी मराठीत ट्विट करत लिहिलं,
‘मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
-संत ज्ञानेश्वर​.’

Next Stories
1 पिझ्झा डिलिव्हरी बॉयने अडल्ट ग्रुपवर शेअर केला अभिनेत्रीचा फोन नंबर
2 ताहिर हुसेनविषयी केलेल्या वक्तव्यावरून जावेद अख्तर यांच्यावर नेटकरी भडकले
3 पं. भीमसेन जोशी यांचे पुत्र राघवेंद्र जोशी यांचे निधन
Just Now!
X