बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ऑनलाईन ब्लॉग्स, फोटो, व्हिडीओ, ट्विट्स यांच्या माध्यमातून ते कायम चर्चेत असतात. यावेळी बिग बी चक्क गुगल मॅपमुळे चर्चेत आहेत. अमिताभ आता गुगल मॅपच्या मदतीने नेटकऱ्यांना पत्ता शोधायला मदत करणार आहेत.

मिड डेने दिलेल्या वृत्तानुसार गुगल मॅपवर आता अमिताभ बच्चन यांचा आवाज ऐकू येणार आहे. गुगल सध्या ऑडिओ फॉर्ममध्ये पत्ता सांगणाऱ्या अॅप्लिकेशनवर काम करत आहे. या अॅप्लिकेशनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारे सॉफ्टवेअर असेल. या सॉफ्टवेअरच्या ऑडिओ फॉर्मला अमिताभ यांचा आवाज दिला जाणार आहे. या नव्या प्रकल्पावरुन बिग बी आणि गुगल यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरु आहे. तसेच गुगलने त्यांच्या आवाजासाठी कोट्यवधींचे मानधन देऊ केल्याचेही म्हटले जात आहे.

Govinda stopped the fleet of vehicles and bought shoe from small shop
गोविंदाला बुटाची भुरळ! रोड शो थांबवून खरेदी केले बूट; किंमत ऐकून तुम्ही म्हणाल…
Dr Anand Deshpande talk about How to take the industry forward
उद्योगाला पुढे कसे न्यावे? जाणून घ्या पर्सिस्टंटचे डॉ. आनंद देशपांडे यांचा गुरुमंत्र…
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
kolhapur, cracks on ambabai mahalaxmi idol
अंबाबाई – महालक्ष्मी मूर्तीवर तडे, तातडीने संवर्धन गरजेचे; पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या पाहणी अहवालात निष्कर्ष

अमिताभ बच्चन आपल्या जबरदस्त अभिनयासाठी ओळखले जातात. अभिनयासोबतच त्यांचा आवाजही तितकाच लोकप्रिय आहे. आजवर अनेक चित्रपट, मालिका, जाहिरातींमध्ये बिग बींच्या आवाजाचा वापर करण्यात आला आहे. अनेक स्टँडअप कॉमेडियन त्यांच्या आवाजाची नक्कल करुन विनोद करतात. त्यामुळे इतका लोकप्रिय आणि देशवासीयांना ओळखीचा असलेला आवाज गुगलने वापरण्याचा निर्णय घेतला आहे.