बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांचा सर्वात जवळचा मित्र कोण ?असा प्रश्न विचारला तर कदाचित ते लेकीचं श्वेता नंदाचं नाव घेतील. हे दोघं बाप लेकीच्या नात्यासोबतच एकमेकांचे चांगले मित्र आहेत. याचा प्रत्ययही अनेक वेळा आला आहे. बिग बी कायम श्वेताच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असतात. मग तिने फॅशन जगतात ठेवलेलं पहिलं पाऊल असो किंवा तिने केलेला रॅम्पवॉक. बिग बी कायम तिला प्रोत्साहन देत असतात. श्वेता बच्चन नंदाने नुकतंच प्रसिद्ध फॅशन डिझायनर अबू जानी -संदीप खोसला यांच्यासाठी रॅम्प वॉक केला. यावेळी श्वेताचं प्रोत्साहन वाढविण्यासाठी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन उपस्थित होते. विशेष म्हणजे आपल्या मुलीचा रॅम्पवॉक कॅमेरात कैद करण्यासाठी बिग बी करत असलेली धडपड यावेळी पाहायला मिळाली.

प्रसिद्ध फॅशन डिझायनर अबू जानी -संदीप खोसला यांच्या नव्या कलेक्शनसाठी श्वेता रॅम्पवॉक करत होती. सहाजिकंच श्वेता नंदा रॅम्पवर असल्यामुळे अनेक छायाचित्रकार तिचे फोटो काढण्यासाठी पुढे सरसावत होते. त्यातच बिग बी देखील आपल्या लेकीचा फोटो आणि व्हिडिओ काढत होते. मात्र या साऱ्यामध्ये छायाचित्रकारांचा अडथळा येत असल्यामुळे त्यांच्या व्हिडिओमध्ये व्यत्यय येत होता. त्यामुळे बिग बींनी चक्की शिट्टी वाजवून छायाचित्रकारांना बाजूला सरकण्यास सांगितलं. सध्या त्यांच्या या शिट्टीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

फोटोग्राफर मध्ये-मध्ये येत असल्यामुळे बिग बींनी अनेक वेळा त्यांना बाजूला होण्यास सांगितलं. मात्र श्वेताचे फोटो काढण्यात मश्गुल झालेल्या फोटोग्राफर्सला बिग बींची हाक ऐकून आली नाही. या कारणास्तव बिग बींनी थेट शिट्टीचा मार्गाचा अवलंब करत या फोटोग्राफर्सला बाजुला होण्यास सांगितलं.

 

View this post on Instagram

 

#shwetabachchan in @abujanisandeepkhosla for #caringwithstyle @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

दरम्यान, प्रसिद्ध फॅशन डिझायनर अबू जानी -संदीप खोसला यांच्यासाठी केलेल्या रॅम्पवॉकमध्ये श्वेता प्रचंड सुंदर दिसत होती. यावेळी श्वेताने ट्रेडिशनल आऊटफिट परिधान केला होता. आतापर्यंत श्वेताने या डिझायनर जोडीसाठी अनेक वेळा रॅम्पवॉक केला आहे.