News Flash

महानायक अमिताभ बच्चन यांना वयाच्या ७६ वर्षी हवा जॉब

ट्विटरवर बायोडेटा केला पोस्ट

अमिताभ बच्चन

महानायक अमिताभ बच्चन यांना वयाच्या ७६ व्या वर्षी नोकरीची गरज आहे. ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल. पण आम्ही ही बातमी तुम्हाला सांगतो आहे कारण अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर स्वतःच त्यांचा बायोडेटा पोस्ट केला आहे. जॉब अॅप्लिकेशन असे नाव देत हा बायोडेटा पोस्ट करण्यात आला आहे. त्यात अमिताभ बच्चन यांनी त्यांचे नाव, किती सिनेमांमध्ये काम केले, कोणत्या भाषा बोलू शकतो, वय किती, उंची किती असे लिहिले आहे.

कदाचित हे सगळे वाचून तुम्हालाही प्रश्न पडला असेल की असे का? तर त्यांनी दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ यांच्यासोबत काम करण्यासाठी हे अॅप्लिकेशन पोस्ट केले आहे. एका वर्तमान पत्राने शाहीद कपूर आणि आमिर खान यांच्यासोबत सह अभिनेत्री म्हणून काम करण्यासाठी दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ यांची उंचीमुळे निवड करता येत नाही अशी बातमी छापली आहे.

खरेतर कतरिना कैफ आणि आमिर खान यांनी धूम थ्री मध्ये आणि शाहीद कपूर आणि दीपिका पदुकोण यांनी पद्मावत सिनेमात एकत्र काम केले आहे. तरीही ही बातमी छापण्यात आल्याने त्याची खिल्ली उडवत महानायक अमिताभ बच्चन यांनी आपला बायोडेटाच ट्विटरवर पोस्ट केला आहे. तसेच मला या दोघींसोबत काम करण्यासाठी उंचीचा काहीही प्रश्न निर्माण होणार नाही असेही म्हटले आहे. अमिताभ बच्चन यांचे हे ट्विट मिश्किल आहे. ते पाहिल्यावर आपल्याला निश्चितच बिग बींच्या अवखळ स्वभावाचे दर्शन घडते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2018 12:11 pm

Web Title: amitabh bachchans job application to work with katrina kaif and deepika padukone
Next Stories
1 औटघटकेचा चमचमाट!
2 चीनी बाजारात ९०० कोटींचा ‘आमिर’ खेळ
3 आम्ही दोघी!
Just Now!
X