नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या चित्रपटाच्या शूटिंगला अखेर सुरुवात झाली आहे. याची शूटिंग सध्या नागपूरमध्ये सुरू आहे. चित्रपटात अमिताभ बच्चन यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. चित्रपटाच्या सेटवरील असाच एक फोटो बिग बींनी शेअर केला असून ते २०२२ च्या फुटबॉल विश्वचषकाची तयारी करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
नागराज मंजुळे दिग्दर्शित हा पहिलाच हिंदी चित्रपट असून अमिताभ बच्चन या चित्रपटामध्ये विजय बारसे ही व्यक्तीरेखा साकारत आहेत. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना व्यसनापासून दूर करण्यासाठी त्यांच्यात फुटबॉलची आवड निर्माण करणाऱ्या अवलियाची भूमिका बिग बी साकारत आहेत. त्यामुळे त्यांनी सेटवर फुटबॉल खेळतानाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला २०२२ साली होणाऱ्या फुटबॉल विश्वचषकाची तयारी करत आहे, असं कॅप्शन दिलं आहे.
T 3027 – Prepping for the World Cup 2022 – !! and .. well .. ya .. !!! pic.twitter.com/7EHPL4Riat
— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 14, 2018
दरम्यान, झुंडमध्ये अमिताभ फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारत असतानाच त्यांनी हा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे हा फोटो चित्रपटाच्या सेटवरचाच असल्याचं सांगण्यात येत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 15, 2018 4:22 pm