News Flash

..जेव्हा रणबीर- बिग बी ‘डेट’ला जातात तेव्हा

चित्रपट पाहण्यासाठी बॉलिवूडचे हे दोन्ही कलाकार थेट मल्टीप्लेक्समध्ये पोहोचले.

आयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाचं सध्या ब्लगेरियामध्ये चित्रीकरण सुरु आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता अमिताभ बच्चन आणि रणबीर कपूर एकत्र झळकणार आहेत. त्यामुळे हा चित्रपट नक्कीच बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करेल असेल दिसून येतंय. विशेष म्हणजे चित्रीकरणातून वेळ काढत चित्रपटाची संपूर्ण टीम मज्जा-मस्ती करतानाही दिसत आहे. काही दिवसापूर्वी बिग बींनी संपूर्ण टीमसाठी सेटवरच वडापावची सोय केली होती. तर आता चक्क बिग बी आणि रणबीर मुव्ही डेटवर गेल्याचं समोर आलं आहे.

सध्या या दोघांच्या मुव्ही डेटचा फोटो प्रचंड व्हायरल होत असून ते फुल ऑन एन्जॉय करताना दिसत आहेत. बिग बी वयाच्या ७५ वयाचे असूनही ते एखाद्या तरुणाप्रमाणे वावरताना दिसतात. हॉलिवूड अभिनेता टॉम क्रुझ याचा ‘मिशन इम्पॉसिबल फॉलआऊट’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी बॉलिवूडचे हे दोन्ही कलाकार थेट मल्टीप्लेक्समध्ये पोहोचले.

At the movies .. Ranbir and I for IMPOSSIBLE Mr Tom Cruise

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan) on

दरम्यान, यावेळी अमिताभ यांनी रणबीरबरोबरचा फोटोही शेअर केला आहे. विशेष म्हणजे ‘ब्रह्मास्त्र’मध्ये रणबीर, बिग बीं बरोबर आलिया भटही झळकणार असून आलियाचा बिग बींसह पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2018 1:46 pm

Web Title: amitabh ranbir watchs tom cruise mission impossible
Next Stories
1 चाहत्यांच्या प्रेमामुळे आजच्या दिवशी माझा पुनर्जन्म झाला – अमिताभ बच्चन
2 मानधन न स्विकारताही आमिर असा कमावतो बक्कळ नफा
3 ‘बाजीराव-मस्तानी’ ‘या’ ठिकाणी आहेत सिक्रेट हॉलिडेवर
Just Now!
X